Monday, February 6, 2023

राज्यसेवा पूर्वपरीक्षा ५ एप्रिल रोजीच, आयोगाची माहिती

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाव्हायरच्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालयं आणि गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ३१ मार्चपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढं ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे.

५ एप्रिल २०२० रोजी योग्य ती काळजी घेऊन, व्यवस्थित नियोजन करुन ही परीक्षा घेण्यात येईल असं परिपत्रक राज्य लोकसेवा आयोगामार्फत काढण्यात आलं आहे. ३१ मार्च रोजी राज्यातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षांच्या पुढील तारखांचा विचार केला जाईल असं स्पष्टीकरणही आयोगाने दिलं आहे.