हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात AC ही लोकांची गरज बनली आहे. वाढते तापमान हे यामागील कारण आहे. आता जवळजवळ उन्हाळा सुरु झाला आहे ज्यामुळे अनेक लोकं आता नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत आहेत. जर आपल्यालाही नवीन एसी घ्यायचा असेल तर अशा परिस्थितीत आपल्याला काही गोष्टींची माहिती हवी. हे ध्यानात घ्या कि, कोणताही एसी IEEE स्टार रेटिंगसहीत येतो. सहसा ग्राहकांना जास्त स्टार रेटिंग असलेला एसी खरेदी करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. कारण, ते कमी वीज वापरतात. अशा परिस्थितीत आज आपण 3 स्टार आणि 5 स्टार एसीमधील फरक जाणून घेणार आहोत….
ऊर्जेच्या कार्यक्षमतेनुसार एअर कंडिशनरला वेगवेगळे रेटिंग दिले जाते. जास्त स्टार रेटिंग असलेले AC कमी ऊर्जा वापरतात. मात्र, आपल्यातील प्रत्येकालाच 5-स्टार रेटिंग असलेला एसी घेणे परवडत नाही. कारण, ते 3 स्टारपेक्षा जास्त महाग असतात.
तसेच 5 स्टार एसी मोठ्या कंडेन्सरसहीत येतात आणि ते इलेक्ट्रिसिटी एफिशिएंट देखील असतात. 3 स्टार रेटिंग असलेले AC डिसेंट एनर्जी एफिशिएंट आहेत, जे लहान कंडेन्सरसहीत येतात.
विजेच्या वापराच्या बाबत बोलायचे झाल्यास, 5 स्टार एसी 3 स्टारपेक्षा कमी ऊर्जा वापरतात. 3 स्टार एसी 1 तासात सरासरी 1.1 युनिट वीज वापरतो तर 1.5 टनचा 5 स्टार एसी फक्त 0.84 युनिट्स वीज वापरतो.
3 स्टार AC च्या फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास आजकाल फिल्टर 3 स्टार एअर कंडिशनरमध्ये येतात, ज्यामुळे धूळ आणि प्रदूषण हवेतून बाहेर ठेवता येते. यासोबतच यामध्ये टर्बो मोड, स्लीप मोड आणि इको मोड सारखे फीचर्स देखील उपलब्ध असतात. बर्याच मोठ्या कंपन्या 3 स्टार स्मार्ट एसी देखील विकतात, जे कस्टमाइज देखील केले जाऊ शकतात.
3 स्टार आणि 5 स्टार स्मार्ट एसी म्हणजे काय ???
स्मार्ट AC हे पारंपारिक एसीसारखेच असतात. यामधील फरक इतकाच आहे की, ते वायफायशी कनेक्ट करता येतात. तसेच ते स्मार्टफोनद्वारेही कंट्रोल करता येतात. याद्वारे आपल्याला मोड बदलायचा असो किंवा एसी चालू/बंद करायचा असो. सर्व काही सहजपणे करता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/air-conditioners/5-star~starrating/pr?sid=j9e%2Cabm%2Cc54
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, कर्जावरील व्याजदरात केली वाढ