हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय रेल्वेचे (Indian Railways) जाळे संपूर्ण भारतभर पसरलेले आहे. जगातील चौथे मोठे रेल्वेचे जाळे असलेला असा हा आपला देश आहे. भारतात 65000 km पेक्षा अधिक मोठे रेल्वेचे जाळे आहे. देशभरात 5 हजार ते 500 रेल्वे स्टेशन आहेत. भारतात 13000 पेक्षा अधिक प्रवासी रेल्वे चालवल्या जातात आणि या स्टेशनवरून साधारण 22 दशलक्ष लोक रोज प्रवास करतात. तरी देखील बऱ्याच जणांना रेल्वेच्या टर्मिनल, सेंट्रल, जंक्शन, आणि स्टेशन यांमधील फरक माहित नसतो. चला तर आज आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो की, नेमक कोणत्या स्टेशनला काय म्हणतात.
1) टर्मिनल / टर्मिनस :
ज्या रेल्वे स्थानकात रेल्वेचा ट्रॅक संपतो असे ठिकाण किंवा ज्या ठिकाणाहून कुठलीही ट्रेन पुढे जाऊ शकत नाही. या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी रेल्वेला आलेल्या दिशेनेच आपला प्रवास करावा लागतो अशा ठिकाणाला त्याला टर्मिनल / टर्मिनस असे संबोधले जाते. भारतात एकूण 27 टर्मिनस स्थानके आहेत.
उदाहरणार्थ :
1) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
2) लोकमान्य टिळक टर्मिनस
3) कोचीन हार्बर टर्मिनल सेंट्रल स्थानक :
2) सेंट्रल-
ज्या ठिकाणी अनेक प्रकारच्या रेल्वे एकत्र येतात. किंवा ज्या ठीकाणी अनेक रेल्वेविभागाची स्थानके एकत्र आलेली असतात अशा ठिकाणाला सेंट्रल रेल्वे स्थानक संबोधले जाते. एखाद्या शहरात 3 ते 4 स्टेशन असतील तर त्या शहरातल्या सर्वात गजबजलेले स्टेशनच नाव सेंट्रल दिले जायचे.
उदाहरणार्थ:
1) मुंबई सेंट्रल
2) चेन्नई सेंट्रल
3) कानपुर सेंट्रल जंक्शन :
3) जंक्शन-
रेल्वेच्या ज्या स्थानाकातून कमीत कमी 3 किंवा त्यापेक्षा अधिक रेल्वेचे मार्ग जातात. त्या स्थानकाला रेल्वेचे जंक्शन असे संबोधले जाते. भारतात 300 पेक्षा जास्त जंक्शन असून मथुरा हे सगळ्यात मोठे जंक्शन आहे.
उदाहरणार्थ:
1) परभणी जंक्शन
2) पुणे जंक्शन
3) मनमाड जंक्शन