राहुल गांधी आणि प्रियंका गांधींमध्ये मतभेद सुरू? काँग्रेसच्याच बड्या नेत्यांने दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपल्या कामाचा जोर वाढवला आहे. अशातच काँग्रेस नेते मिलिंद देवरा त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून राहुल गांधी यांना मोठा धक्का दिला आहे.मिलिंद देवरा यांच्या पक्ष प्रवेशानंतर आता काँग्रेसच्याच एका बड्या नेत्याने राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वडेरा यांच्यात मतभेद असल्याची मोठी माहिती दिली आहे.

काँग्रेसचे प्रमोद कृष्णम यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यातील मतभेदांची माहिती देत म्हटले आहे की, “काँग्रेसला खास लोकांनी घेरले आहे. जे प्रियंका गांधींना पद्धतशीरपणे बाजूला करण्याचे काम करत आहेत. तसेच राहुल गांधी यांना भारत यात्रेच्या निमित्ताने प्रवास चालू ठेवण्याचा सल्ला काहींनी दिला आहे”

त्याचबरोरीने, “गांधी घराणे हे रामाच्या विरोधात नाही. त्यामुळे राम मंदिराला त्यांचा विरोध नसेल. परंतु यामागे भाजप जे राजकारण करत आहे, त्याला कॉंग्रेसचा विरोध आहे. काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेला भगवान प्रभू राम यांचा आशीर्वाद आहे” अशी भूमिका काँग्रेसची असल्याचे प्रमोद कृष्णम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सध्याच्या घडीला राहुल गांधी यांचे मोठे समर्थक मिलिंद देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. अशातच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यामध्ये देखील बात सुरू असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी भाजपच्या देखील एका नेत्याने या भाऊ बहिणीमध्ये वाद सुरू असल्याचा दावा केला होता. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.