मुंबई | केवळ महाविकास आघाडीत नव्हे तर काॅंग्रेसमध्येही मतभेद आहेत. महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या सरकारने राजकारणाचा खेळखंडोबा चालू असल्याची टीका शरद पवार यांच्या भेटीवरून विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
प्रविण दरेकर म्हणाले, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाच्या विधानावर ठाम आहे, ते पवारांच्या भेटीनंतरही म्हणाले आहेत. महाविकास आघाडीत मतभेद हसत खेळत आहेत. शरद पवारांच्या सोबत झालेल्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चर्चेला नसणे म्हणजे काॅग्रेसमध्ये काय चालले आहे हे दिसून येते. नाना पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न करत आहे.
महाविकास आघाडीत मतभेद आहेत हे दिसून येत आहे, मात्र त्याबरोबर काॅंग्रेसमध्येही मतभेद आहेत. राज्यातील या सरकारने राजकारणाचा खेळखंडोबा केलेला आहे. नाना पटोले स्वबळाची भाषा करतात. तेव्हा मुख्यमंत्री जेवणावरून स्वबळाची भाषा करतात, म्हणजे नक्की महाविकास आघाडी कशाप्रकारे मतभेदात हसतखेळत आहे, हे दिसून येते.