महाराष्ट्रात” नो ब्रा डे” साजरा केला पाहिजे – तृप्ती देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री हेमांगी कवीने लिहिलेली एक फेसबुक पोस्ट सध्या वादाचा विषय बनली आहे. मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची कि नाही ही माझी पंसत आहे.” अस् विधिन हेमांगी हिने केले होते. त्यानंतर आता भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनीही यामध्ये उडी घेतली असून महाराष्ट्रात नो ब्रा डे साजरा केला पाहिजे असं म्हटलं आहे.

तसेच, सदर अभिनेत्री आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड च्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही. त्यांच्या या जाहीर लेखाचे स्वागतच आहे. सर्वांनीच आता जाहीरपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे. परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की ज्या महिला या संदर्भात गॉसिप्स करतात किंवा उघडपणे बोलत नाहीत, किंवा विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांचीच तर मानसिक बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि तो करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. परंतु त्यावेळी मात्र ना प्रवीण तरडे यांनी जाहीर पाठिंबा दिला, ना हेमांगी यांनी असं म्हणत देसाई यांनी हेमांगी यांना टोला लगावला आहे.

जेव्हा महिलांना मासिक पाळी या विषयावरून दुजाभाव केला जातो, अनेक ठिकाणी बंदी घातली जाते याविषयीही आम्ही कृतीत आंदोलने केली परंतु अशा वेळेला असे लोक का साथ देत नाहीत हे समजले नाही. इंदुरीकर तर जाहीरपणे महीलांच्या वेशभूषा वर आणि महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य अनेक कीर्तनातून करत असत त्यावेळेला हे सर्व कुठे होते असाच प्रश्न पडतो? असा प्रश्न उपस्थित करत देसाई यांनी उशिरा का होईना परंतु धाडस करून लिहायला तरी सुरुवात केली “हे ही नसे थोडके” असं म्हणत कवी यांना मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.

माझी तर या जानेवारीपासूनच मनात एक संकल्पना अशी आहे की आमच्या भूमाता फाऊंडेशन च्या माध्यमातून यावर्षीपासून आपल्या महाराष्ट्रात” #नो_ब्रा_डे” साजरा केला पाहिजे,.कृतीतून जेवढा संदेश जाईल तेवढा बदल होण्यास सोपे जाते.विरोध होईलच परंतु पुढाकार घेऊन करणेही तितकेच गरजेचे आहे. आम्ही जेव्हा हा दिवस साजरा करू तेव्हा स्वतःहून तुम्ही यात सहभागी व्हाल हीच अपेक्षा असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

Leave a Comment