दिलीप गांधींचे चिरंजीव अहमदनगर मधून लोकसभेच्या रिंगणात, विखेंची डोकेदुखी वाढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | सुशिल थोरात

अहमदनगरमध्ये पुन्हा एक राजकिय भूकंप पहिला मिळाला. भाजप चे विद्यमान खाजदार दिलीप गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र गांधी यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत आता तिरंगी लढत पाहायला मिळणार असून त्यामुळे डॉ सुजय विखे यांच्या अडचणी वाढल्या असून मोठं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.

अहमदनगरला खासदार दिलीप गांधी यांच्या चिरंजीवांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला असला तरी दिलीप गांधी यांनी पक्षाचं काम करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मी पक्ष सांगेल ती भूमिका पार पाडेल’ असं गांधी यांनी जाहीर केल्यामुळे ते आता विखेंचंच काम करणार हे निश्चित झालंय. मात्र मुलगा अपक्ष लढणार असल्याने त्यांच्या पुढच्या अडचणी वाढणार आहेत. गांधी आपल्या मुलाची समजूत काढणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माझा मुलगा माझं ऐकेल असं दिलीप गांधी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर आपण उमेदवारी करणारच असा निश्चय सुवेंद्र गांधी यांनी केलाय. तुम्ही वडिलांचं ऐकणार नाही का? या प्रश्नाला त्यांनी उत्तर देताना ‘त्यांचे आशीर्वाद माझ्या बरोबर असतील’ असे म्हणले आहे. सुजय विखे हे आपलं ऐकत नाहीत असं विधान त्यांचे वडील राधाकृष्ण विखे यांनी केलं होतं. आता तीच पारिस्थिती गांधी यांच्या कुटुंबात अली आहे. आता पुढे काय होणार आणि जर तिरंगी लढत झाली तर याचा फायदा कोणाला होणार याचीच चर्चा नगर जिल्ह्यात चालू आहे.

Leave a Comment