हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या 35 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र यावेळी शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे आणि एकेकाळचे त्यांचे स्वीय्य सहाय्यक म्हून काम पाहणारे दिलीप वळसे पाटील यांनीही अजित पवारांना पाठिंबा दिल्याने चर्चाना उधाण आलं होते. रोहित पवारांनी तर शोधलं मीडियावर पोस्ट शेअर करत वळसे पाटील साहेब, पवार साहेबानी काय कमी केलं होते तुम्हाला असा थेट सवालही केला होता. या सर्व घडामोडीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी आज प्रथमच भाष्य केलं आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, शरद पवार यांना सोडल्याच्या निर्णयाचं आपल्याला दुःख वाटत आहे. परंतु हा एकट्याचा निर्णय नव्हता तर सामुदायिक निर्णय होता. अजित पवार यांच्यासोबत शपथ घेण्याच्या 15 दिवस आगोदर आमचं शरद पवार साहेबांशी बोलणं झालं होतं, त्यांनी सांगितलं होत कि भाजपसोबत जाऊ नका. त्यानंतर आम्ही सुप्रियाताईंच्या कानावर ही गोष्ट घातली, तुम्ही साहेबांना समजवा असं सांगितलं परंतु त्यानंतरही साहेबांकडून काहीच उत्तर आलं नाही. मग आम्हीच त्यांच्याकडं गेलो आणि आमची भूमिका सांगितली असा खुलासा वळसे पाटलांनी केला. डिंभे धरणाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे वळसे पाटील यांनी सांगितलं.
डिंबा धरणाचं पाणी बोगदा करून नगर तालुक्यात न्यायचा प्रस्ताव मी मंत्री असताना मांडला होता, परंतु त्यानंतर आमचं सरकार गेलं आणि या सरकारने धरणातून बोगदा काढायचा निर्णय घेतला. मागच्या सरकारमध्ये पावसाचं वाढलेलं पाणी नगरमध्ये द्यायचं असा होता. जेव्हा पाणी कमी पडले तेव्हा आता सरकारने निर्णय घेतला. पावसाचं पाणी बंधाऱ्यात येईल तेवढच पाणी तालुक्यात द्यायचं. आता जुन्नर आणि आंबेगावमध्ये ऊस शेती आहे आणि ऊसाला पाणी मिळालं नाही. तर शेतकरी आर्थिक अडचणीत येईल. मी हयात भर आमदार राहील किंवा मंत्री राहील हे नक्की नाही. मात्र असे निर्णय झाले तर येथील परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण होईल. एका बाजूला तालुक्याचा प्रश्न आणि दुसरीकडे पवारसाहेबांचे प्रेम असा पेच निर्माण झाला. काही लोक म्हणतील की सत्तेच्या बाहेर राहून ही झालं असतं, मात्र अशा कामांना सत्तेत राहणं गरजेचं असतं, असंही वळसे पाटील म्हणाले.
मला ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सची कोणतीही नोटीस आलेली नाही. एक जनाने सांगितलं कि, पराग आणि गोवर्धन डेअरीला नोटीस आली म्हणून मी अजित दादांबरोबर गेलो परंत्तू माझा आणि या डेअरीचा कसलाही संबंध नाही. येव्हडच नव्हे तर आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीची या डेअरीमध्ये एक रुपयाचीही गुंतवणूक नाही असे स्पष्टीकरण वळसे पाटील यांनी दिले.