‘जर मी ठरवले तर भारत टी-२० वर्ल्डकप जिंकू शकतो’; ‘या’ खेळाडूचे मोठे वक्तव्य

0
35
T 20 world cup
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपची तयारी करत आहे. तसेच भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपच्या दृष्टीनेदेखील तयारी करत आहे. या वर्ल्डकपसाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. याचदरम्यान भारताच्या एका खेळाडूने वर्ल्डकप संदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भारतचा विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिक सध्या संघातून बाहेर असला तरी लवकरच तो एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या फायनल सामन्यासाठी दिनेश कार्तिक समालोचन करताना दिसणार आहे. माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्या समालोचन टीममध्ये दिनेश कार्तिक याला स्थान देण्यात आले आहे.

कार्तिक नव्या भूमिकेत असला तरी सध्या आयपीएलमध्ये मध्ये खेळणाऱ्या भारताच्या या विकेटकीपरची भारतीय संघाकडून पुन्हा खेळण्याची इच्छा आहे. कार्तिकने सांगितले की त्याला टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान मिळवायचे आहे. जर तुम्ही माझी टी-२० मधील आकडेवारी पाहिली असेल तर मला १०० टक्के भारतीय संघात स्थान मिळाले पाहिजे. आणि मला विश्वास आहे की भारतीय संघात स्थान मिळेल. बाकी आता सगळे निवड समितीवर अवलंबून आहे की ते काय विचार करतात असेदेखील कार्तिक म्हणाला.

मी संघात मधळ्या फळीत फिनिशरची भूमिका चांगल्या पार पाडू शकतो. मला वाटते की मधळ्या फळीत मी योगदान देऊ शकतो. तसेच मी टी-२० वर्ल्डकपमध्ये स्वत:चे कौशल्य दाखवू शकतो. मी खेळपट्टीवर जाऊन प्रभाव सोडू शकतो. याच एका कारणामुळे भारतीय माझी गरज आहे. मागच्या वेळी मी माझ्या खेळीतून त्याचा नमुना दाखवला आहे. मी जर कौशल्य दाखवले तर भारताकडे वर्ल्डकप जिंकण्याची चांगली संधी आहे असेदेखील दिनेश कार्तिक म्हणाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here