कराड- पाटण शिक्षक सोसायटीत दिनेश थोरातांच्या विजयाची औपचारिकता बाकी : सर्व उमेवारांचा जाहिर पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची निवडणूक चांगलीत रंगात आली आहे. अशावेळी उंडाळे गट क्रमांक- 3 मधून दिनेश दिनकर थोरात (चिन्ह :  कपबक्षी) यांची केवळ विजयाची औपचारिकता बाकी आहे. कारण गुरूजन एकता पॅनेलमधील दिनेश थोरात यांच्या विरोधात विरोधकांनी उमेदवार दिला नाही तर अपक्ष असलेल्या तीन्ही उमेदवारांनी आपला जाहीर पाठिंबा दिला आहे.

कराड- पाटण सोसायटी निवडणुकीत गुरूजन एकता पॅनेलचे उमेदवार दिनेश थोरात यांना अपक्ष उमेदवार प्रदिप महादेव रवलेकर, सर्जेराव तातोबा साठे आणि यशवंत नामदेव कांबळे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. उंडाळे गट क्र. 3 मधून 4 जणांनी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दिनेश थोरात यांना तिन्ही उमेदवारांनी पाठिंबा दिला. यामुळे आता केवळ निवडणूक रिंगणात दिनेश थोरात हे एकटेच असल्याने विजयाची निश्चित झाला आहे.

दिनेश थोरात यांनी कराड व पाटण तालुक्यात 26 वर्षे सेवा बजावली आहे. अत्यंत शांत, कष्टाळू, प्रामाणिक व शिक्षक सहकाऱ्याचे मित्र अशी त्याची ओळख आहे. पाटण तालुक्यात चव्हाणवाडी, मस्करवाडी, धामणी येथे तर कराड तालुक्यात वनश्रीनगर- ओंड व विठोबाचीवाडी जिल्हा परिषद शाळेत ज्ञानदानाचे काम केले आहे. श्री. थोरात यांना रोटरी क्लबचा नेशन बिल्डर पुरस्कार व पंचायत समिती कराड यांचा स्व. यशवंतराव चव्हण गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला आहे.

सोसायटीचा कारभार राज्यात दिशादर्शक करण्याचा मानस ः दिनेश थोरात
उंडाळे गटातील तीन्ही अपक्ष उमेदवारांनी मला पाठिंबा दिला. त्याबद्दल त्याचे मी आभार मानतो. माझ्या गटातून आता निवडणूकीत माझा विजय जवळपास निश्चित झाला आहे. तेव्हा शिक्षक मतदार बंधूनी गुरूजन एकता पॅनेलच्या कपबशी चिन्हावर शिक्का मारून सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे. मला सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक मतदार बंधू, भगिनीच्या सहकार्यामुळे मला आज ही संधी मिळत आहे. निवडणूकीनंतर कराड- पाटण सोसायटीचा कारभार शिक्षकांच्या संस्थामध्ये सर्वात आदर्शवत  करण्याचा आपला मानस असल्याचे दिनेश थोरात यांनी सांगितले.