टीम, HELLO महाराष्ट्र | अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग भगनाणी यांनी 2018 मध्ये लग्नागाठ बांधली . आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे . या निमित्ताने त्यांच्या फॅन्स कडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे .
आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस मात्र या दाम्पत्याने ट्रॅडिशनल पद्धतीने साजरा केलाय . रणवीर सिंग आणि दीपिका हे तिरुपती बालाजी मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते . यावेळी दोघांनी ट्रॅडिशनल औटफिट निवडला . रणवीरने गोल्डन शेरवानी आणि ब्राऊन गॉगल्स घातले होते . तर दीपिका अत्यंत सुंदर अशा लाल जोड्यात दिसली. लाल बुंद भरजरी साडी नेसलेली दीपिका नववधू सारखी दिसत होती . त्यात चोकर आणि लांब गोल्ड नेकलेसने तिच्या लावण्यात भर घातली .
ही साडी काही खास देखील आहे . कोणत्या प्रतिष्ठित डिझायनर ने डिझाईन केली म्हणून नव्हे, तर ही साडी दीपिकाला तिच्या सासरच्या मंडळींनी लग्नात गिफ्ट केलेली आहे . रणवीर आणि दीपिकाच्या या ट्रॅडिशनल लूकला त्यांच्या फॅन्सने देखील खूप पसंत केलं आहे .
अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग भगनाणी यांनी 2018 मध्ये लग्नागाठ बांधली . आज त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे . या निमित्ताने त्यांच्या फॅन्स कडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे .
आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस मात्र या दाम्पत्याने ट्रॅडिशनल पद्धतीने साजरा केलाय . रणवीर सिंग आणि दीपिका हे तिरुपती बालाजी मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते . यावेळी दोघांनी ट्रॅडिशनल औटफिट निवडला . रणवीरने गोल्डन शेरवानी आणि ब्राऊन गॉगल्स घातले होते . तर दीपिका अत्यंत सुंदर अशा लाल जोड्यात दिसली . लाल बुंद भरजरी साडी नेसलेली दीपिका नववधू सारखी दिसत होती . त्यात चोकर आणि लांब गोल्ड नेकलेसने तिच्या लावण्यात भर घातली . ही साडी काही खास देखील आहे . कोणत्या प्रतिष्ठित डिझायनर ने डिझाईन केली म्हणून नव्हे, तर ही साडी दीपिकाला तिच्या सासरच्या मंडळींनी लग्नात गिफ्ट केलेली आहे . रणवीर आणि दीपिकाच्या या ट्रॅडिशनल लूकला त्यांच्या फॅन्सने देखील खूप पसंत केलं आहे .