थेट भरती : सातारा येथे सोमवारी शिकाऊ उमेदवारांचा मेळावा

सातारा | मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र सातारा द्वारे आयटीआय सातारा मोळाचा ओढा येथे दि. 21 मार्च 2022 रोजी सोमवारी सकाळी 10 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यातील नामांकित कंपनीचे अधिकारी त्यांच्या कंपनीची माहिती अटी, शर्ती, सुविधा बाबतची माहिती देवून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन ,प्रमाणपत्रे तपासून त्याच दिवशी भरती केली जाणार आहे. सोबतच ॲप्रेनटीसशीपपोर्टल बाबतचे प्रशिक्षण व शंका निरसन बाबत ही मार्गदर्शन केले जाणार आहे. आयटीआयच्या फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशीयन, कोपा, डिझेलमेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, ग्राइंडर, पेंटर, ड्राफ्ट्समन, मेकॅनिक, शिटमेटल वर्कर, वायरमन, मेकॅनिक मशीन टुल मेंटेनन्स, टुल आणि डायमेकर, इलेक्ट्रॉनिक्स, रेफ्रीजरेशन आणि एयरकंडिशनिंग अशा बहुतेक सर्व ट्रेडच्या उमेदवारांना मोठ्या कंपनीतॲप्रेंटीसशीपची संधी प्राप्त होणार आहे.

तरी आयटीआय पास तसेच इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह आयटीआय सातारा येथे दि. 21 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य सचिन धुमाळ, उपप्राचार्य संजय मांगलेकर, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार मिलिंद उपाध्ये यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी बीटीआरआय द्वारा आयटीआय सातारा येथे संपर्क साधावा.