“राजकारणात काहीही होऊ शकते, महाराष्ट्रात मी पूर्णपणे भाजपचे सरकार आणणारच.” : देवेंद्र फडणवीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतीच पाच राज्यांसह गोवा विधानसभा निवडणूक पार पडली. या ठिकाणी भाजपला चांगले यश मिळाले. गोवा विधानसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काम पाहिले आणि या ठिकाणी भाजपची सत्ता आणली. निवडणुकीनंतर फडणवीस नागपूरला आले असता त्याची जंगी पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी राजकारणात काहीही होऊ शकते. महाराष्ट्रात पूर्णपणे मी भाजपचे सरकार आणणारच. ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होती. त्यावेळी भाजपच नंबर वन असणार असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

उत्तर प्रदेश व गोवा विधानसभा निवडणूक विजयानंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व विरोधीप नेते देवेंद्र फडणवीस यांचा नागपुर येथे भव्य स्वागत समारंभ पार पडत आहार. त्यासाठी आज फडणवीस नागपूरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गोव्यात, युपी, उत्तराखंड मध्ये जो विजय मिळालेला आहे तो लोकांनी एक प्रकारेमोदीजींच्या कामातील दिलेली पावतीच म्हणावे लागेल. २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजप पूर्णपणे बहुमताचे सरकार स्थापन करेल.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/508328384304836

गोवानंतर आता महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. आणि ती लवकरच आणू. तसेच जनता हेच आमचे मिशन आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. महाराष्ट्रात पूर्णपणे मी भाजपचे सरकार आणणारच. ज्या क्षणी महाराष्ट्रात निवडणुका होती. त्यावेळी भाजपच नंबर वन असणार. त्यासाठी आता आम्हीही तयारीला लागलो आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.

Leave a Comment