आरेवाडी सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालकांचा ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | आरेवाडी (ता. कराड) येथील जय किसान विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील विजयी संचालकाचा ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

श्री भैरवनाथ रयत ग्रामविकास पॅनेलने निवडणूक लागलेल्या सर्वच्या सर्व 10 जागांवरती मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्याचबरोबर एक जागा बिनविरोध अशा एकूण 11 जागा मिळविल्या. तर भैरवनाथ परिवर्तन पॅनेलला केवळ एक जागा बिनविरोध करण्यात यश आले होते.

विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे (कंसात मते) ः- सर्वसाधारण मतदार संघातून ः रमेश अधिकराव कणसे (139), संपत शंकर चव्हाण (139), संजय रामचंद्र ढगाले (145), प्रल्हाद अंतु देसाई (144), विलास बापू देसाई (148), रघुनाथ पोपट बाबर (136), मधुकर शंकर यादव (145), संजय संपत यादव (136) महिला राखीव मतदार संघातून- बेबीताई मुराजी देसाई (148), सुमन शिवाजी यादव (146) यांनी विजय मिळवला.

सोसायटीत इतर मागास प्रवर्गातून निजाम मज्जीद मुल्ला आणि विमुक्त मागास प्रवर्गातून मारुती बाबुराव चव्हाण हे दोघे बिनविरोध निवडून आले होते. या निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती राखीव प्रवर्गात कोणताही अर्ज दाखल न झाल्याने सदरची जागा रिक्त राहिली. यावेळी शिवाजी यादव, लक्ष्मण देसाई, संतोष चव्हाण, मुराजी देसाई आदी उपस्थित होते.

 

Leave a Comment