हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवीन दिवस … आणि रोज नवीन सुरुवात पण ती चहा न घेता होता असेल तर अनेक जण कासावीस होतात. अनेकांना चहा घेतल्याशिवाय आपला दिवस सुरु झालाय असे वाटतच नाही. जेव्हा भरपूर दूध असलेला आणि आले आणि इलायची वर्धित चहा घेतात तेव्हा कुठे त्यांना हायस वाटत आणि त्यांना आपले काम करण्यासाठी हुरूप येतो. अश्याच सवयी असलेले खूप सारे तुम्हाला लोक तुम्हाला बघायला भेटतील किंवा खूप अधिक शक्यता आहे की, तुम्ही त्यातलेच एक असाल कारण जगातील एक तृतीअंश लोक आपल्या दिवसाची सुरुवात भरपूर दूध टाकलेला चहा घेऊनच करतात . परंतु हि बाब शरीरासाठी गंभीर आहे. शास्त्रज्ञानी केलेल्या अभ्यासातून पुढे आले आहे की, दुधाचा चहा घेणे तुमच्यासाठी आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी अधिक घातक आहे.
चहामुळे पित्ताचा त्रास होतो किंवा जेवण कमी होणे असे दुष्परिणाम तुम्हाला आजवर माहित असतील. मात्र दुधाचा चहा घेणे (Milk Tea) याहीपेक्षा अधिक घातक आहे. दुधाच्या चहामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. सिंघुआ युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ फायनान्स अँड इकॉनॉमिक्स मधील संशोधकांनी बीजिंगमधील 5,281 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले,त्यात त्यांना असे आढळून आले की दुधाच्या चहाच्या व्यसनाची लक्षणे केवळ वास्तविक नसून वाढत्या नैराश्य (depression) आणि चिंता (Anxiety) यासारख्या समस्यांशी संबंधित आहेत.
दुधाच्या चहाच्या सवयीमुळे तुम्हाला त्याचे व्यसन लागू शकते. ज्यामध्ये चहा घेण्याचे प्रमाण वाढू शकते .अवलंबित्व वाढू शकते . तुम्ही चहा सोडण्यास असमर्थ ठरू शकता आणि तुम्हाला अपराधी असल्यासारखं सुद्धा फील होऊ शकत असं संशोधनात समोर आले आहे.
दुधाच्या चहाचे काय आहेत अन्य नुकसान :
1) दुधाच्या चहामुळे शरीराला होणारी हानीही अगणित आहे. दुधाच्या चहाचे सेवन केल्याने झोपेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
2) चहाच्या अतिसेवनाने शरीरातील उरलेल्या पोषक तत्वांमध्ये व्यत्यय येतो. शरीराला इतर घटक शोषून घेणे कठीण जाते.
3) गर्भवती महिलांना जास्त चहा पिणे टाळण्याचा सल्ला दिला जातो.