तुम्हीही उभं राहून पाणी पिता? हे नुकसान माहित आहे का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण घरात पाणी पीत (Drinking Water) असताना आपल्या घरातील वडिलधारी आपल्याला नेहमी सांगत असतात  की उभा राहून घाईने पाणी पिऊ नये आणि आपण नेहमीच दुर्लक्ष करून सोडून देतो. आजकाल धावपळीच्या या जगात पाणी पिण्याचा सुद्धा अनेकजण कंटाळा करतात. काहीजण तर घाईघाईत उभ्या उभ्या पाणी पितात आणि आपल्या पुढच्या कामाला लागतात. पण  तुम्हाला माहित आहे का? उभा राहून पाणी पिण्याचे तुमच्या शरीरासाठी  किती नुकसानदायक ठरू शकते. हला तर मग पाहुया.

माणसाचे शरीर हे 70% पाण्यानेच बनलेले असते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण शरीरप्रक्रिये दरम्यान कमी होत राहते. त्यामुळे दिवसभरात किमान 7- 8 ग्लास पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण हे पाणी पिताना उभा राहून न पिता व्यवस्थित बसून शांततेत पाणी पिण्याचा सल्ला आपल्या प्रत्येकाच्या घरातील वडीलधारी करत असतात. त्यामागचे वैज्ञानिक कारण आपण जाणून घेऊया. आणि उभं राहून पाणी पिल्याने शरीराला नेमकं काय नुकसान होते ते सुद्धा समजून घेऊया.

1)  अन्ननलिकेला नुकसान होते :

घाईघाईत पाणी पिल्याने पाणी अतिशय गतीने अन्ननलिकेत जाऊन आदळते. त्यामुळे अन्ननलिकेच्या स्नायूवर ताण येऊ शकतो . तसेच आपल्या जठराची  पाणी शोषण करण्याची क्षमता कमी होऊ शकते. यामुळे पित्ताचा त्रास देखील वाढू शकतो .

2) किडनीवर परिणाम  :

उभा राहून पाणी पिल्याने जठाराची शोषण क्षमता कमी होऊन शरीरातील क्षार व अन्य घटकांचा समतोल बिघडू शकतो . त्यामुळे शरीरातील द्रव्याचे किडनीच्या माध्यमातून छाननी करताना किडनीवर ताण येऊन किडनीवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो .

3) हाडांना नुकसान पोहचते  :

उभ्याने पाणी पिल्याने शरीरातील द्रव्याचे प्रमाण अधिक वाढून त्यामुळे नसांवर ताण येतो. त्यामुळे आपल्या गुडघे आणि इतर जोडहाडे दुखायला सुरुवात होते. अर्थराइटीस सारख्या आजारासारखे लक्षण देखील यामुळे दिसू लागतात.

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

तज्ज्ञांच्या मते, पाणी पिण्याचा योग्य मार्ग म्हणजे पाणी बसून पिणे. यासाठी खुर्चीवर बसा, पाठ सरळ ठेवा आणि नंतर पाणी प्या. यामुळे मेंदूपर्यंत पोषक घटक पोहोचतात आणि मेंदूची क्रिया सुधारते.  इतकेच नाही तर पचनक्रिया सुधारते आणि पोट फुगण्याची समस्या होत नाही.