फलटण | फलटण शहरात डी. एड चाैकात चढावरून उसाने भरलेली ट्रॉलीचा हूक तुटला आणि उसाने भरलेली ट्रॉली तीव्र उतारावरून सुसाट सुटली.उसाने भरलेली ट्राॅली पाठीमागे धावत असताना आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी समयसूचकता दाखवत रस्त्यावरील वाहनांना बाजूला केले. सुदैवाने ही ट्रॉली एका विजेच्या खांबाला धडकली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यामध्ये विजेच्या खांबावरील बंद लाईट सुरू झाल्याने सोशल मिडियावर मजेशीर कमेंट लोकांच्यातून मिळत आहेत.
फलटण शहरातील डीएड चाैकात ही घटना साेमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. फलटणच्या मुख्य चौकात घडलेला हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झालेला आहे. कॅमेरात कैद झालेल्या व्हिडिअोत ट्राॅली उलट्या दिशेने सुसाट सुटली आहे. त्यानंतर अपघात होवू नये, याकरिता फलटणकरांनी वाहन चालकांना सावध केले. त्यामुळे कोणताही अपघात झाला नाही. मात्र या सुसाट सुटलेल्या ट्राॅलीमुळे बंद असलेली स्ट्रीट लाईट सुरू झाल्याचे दिसत आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/968759750516830
फलटण तालुक्यात सध्या उसाचे गाळप कारखान्यांकडून सुरू आहे. ऊस गाळपासाठी एक ट्रॅक्टर ट्राॅलीतून ऊस वाहतूक करत होता. अशावेळी हूक तुटल्याने ही ट्राॅली उलट्या दिशेने सुसाट सुटल्याने अपघाताची शक्यता वर्तविली जात होती. मात्र फलटणकरांच्या समयसूचकतेने हा अपघातही टळला आणि स्ट्रीट लाईही सुरू झाली.