फडणवीसांचेच अंडरवर्ल्डशी संबंध, उद्या हायड्रोजन बॉम्ब फोडणार; मलिकांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या कुटुंबीयांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांनतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांवर पलटवार केला आहे. मीच उद्या सकाळी 10 वाजता फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उघड करून हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे असा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

फडणवीस यांना जी कागदपतत्रा बाबत माहिती दिली ते कच्चे खेळाडू आहेत. खर तर फडणवीस यांनीच स्वतः मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्ड च्या साथीने राज्याला वेठीस धरले असा आरोप मलिक यांनी केला.गोवावाला कम्पोउंट मध्ये सरदार वली खान चे घर. आम्ही जागेचे भाडेकरू होतो. गोवावाला कम्पोउंट मध्ये वॉचमन सारख काम केलं.फडणवीस यांनी राईचा पर्वत केला आहे असेही नवाब मलिक यांनी म्हंटल.

फडणवासांनी आरोप केलेल्या जमीनीची खरेदी कायद्यानुसार झाली आहे. माझं अंडरवर्ल्डशी कनेक्शन नाही. माझ्या जावायाच्या घरात गांजा सापडल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ते माफी मागत नाहीत. आशा आहे, ते माफी मागणार नाहीत. लढाई सुरुच राहिल. माझी मुलगी उद्या फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवेल असेही नवाब मलिक यांनी म्हंटल

फडणवीस यांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावं, मी कोणत्याही चौकशीला तयार आहे असेही नवाब मलिक यांनी म्हंटल. फडणवीस यांचा बॉम्ब आज फुटलाच नाही. उलट उद्या मीच फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी असलेलं संबंध जाहीर करून हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे असं नवाब मलिक यांनी म्हंटल.

You might also like