हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचे २२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
दरम्यान, आज राज्यात २ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं राज्यातील कोरोना बाधित मृत्यूची संख्या आता ८ झाली आहे. आज मृत झालेल्यापैकी बुलढाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.सदर इसमाला मधुमेह असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर तिकडे होता. तर दुसरीकडे मुबंईत एका 40 वर्षीय महिलेचा केईएम रुग्णालयात तीव्र श्वसनाचा त्रास झाल्याने मृत्यू झाला होता. या महिलेची कोरोना टेस्ट केल्यानंतर ती करोना बाधित असल्याचं आज स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता.
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.