टोल प्लाझावर 24 तासात परत आल्यास देण्यात येणारी सूट अजूनही सुरूच, त्याचे पैसे परत कसे मिळवायचे ते जाणून घ्या

Fastag
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर आपण हायवे वरून प्रवास करत असाल आणि 24 तासात परत आलात तर टोल प्लाझावरील सूट अद्यापही चालू आहे. तथापि, त्याची पद्धत मात्र नक्कीच बदलली आहे. वास्तविक, संपूर्ण टोल टॅक्स आपल्या Fastag टॅगमधून दोन्ही बाजूंनी वजा केला जातो, ज्यामुळे सूट मिळण्याबद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सूट मिळालेले पैसे थोड्या वेळाने खात्यात परत येतात. जर पैसे परत आले नाहीत तर आपण बँकेशी संपर्क साधावा. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) च्या नियमांनुसार बँकेला सूट दिलेले पैसे त्वरित परत करावे लागतात.

सूट दिलेले पैसे परत मिळण्याच्या पद्धतीमध्ये काय बदल झाले ते जाणून घ्या
टोल प्लाझामध्ये Fastag अनिवार्य होण्यापूर्वी 24 तासात परत येण्याची शक्यता असल्यास ड्रायव्हरला दोन्ही बाजूंचा टोल भरायला वागायचे. यामध्ये तुम्हाला एकूण टोल शुल्कामध्ये 25 टक्के सूट मिळणार होती. आता वाहनांमध्ये Fastag अनिवार्य करण्यात आलेले आहे. मात्र सूट अद्याप उपलब्ध आहे, पण त्याची पद्धत नक्कीच बदलली आहे. यासंदर्भात NHAI चे जनसंपर्क अधिकारी म्हणाले की,”टोल प्लाझावर उपलब्ध असलेल्या सूटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जेव्हा एखादे वाहन टोलमधून जाते तेव्हा FASTag वरून संपूर्ण टोल वजा केला जाईल आणि जर ते वाहन 24 तासांच्या आत परत आले तर पहिले FASTag वरून पूर्ण शुल्क वजा करण्यात येईल, परंतु जेव्हा त्या वाहनाची माहिती सर्व्हरपर्यंत पोहोचेल आणि तिथे कळेल की 24 तासांच्या आत वाहन परत आले, तर तुम्हाला वन वे टोल शुल्कावर 50 टक्के सूट मिळेल आणि ती रक्कम बँक खात्यात किंवा Paytm वर परत येईल.”

जर ग्राहकाला पैसे परत मिळाले नसतील तर बँकेत संपर्क साधा
जनसंपर्क अधिकारी म्हणाले की,” सहसा सूट दिलेले पैसे त्वरित परत केले जातात. मात्र, कधीकधी सर्व्हरमुळे यास 10 -12 तास लागतात. जर पैसे परत केले गेले नाहीत तर ड्रायव्हरने बँकेशी किंवा गेटवेशी संपर्क साधावा ज्याद्वारे त्यांना पैसे परत दिले जातील. NHAI च्या नियमांनुसार परताव्याची रक्कम 24 तासांच्या आत परत आलेल्यास पैसे त्वरित परत करावे लागेल. सध्या देशभरातील 780 टोल प्लाझामध्ये फास्टॅग अनिवार्य झाले आहे. यात NHAI सह राज्यातील टोल प्लाझाचा समावेश आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group