UPSC, MPSC च्या पल्याडही भलं मोठं जग आहे; आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : सध्या स्पर्धा परिक्षा आणि त्यांची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या अनुषंगाने विविध माध्यमांत चर्चा सुरु आहेत. लवकर न निघणारी भरती, वाढत जाणारं वय, पोस्टपोन होणार्‍या परिक्षा, यामुळे येणारा तणाव या विषयांवर आपण अनेक मतमतांतरे ऐकत असतो. मात्र HELLO महाराष्ट्र आणि करिअरनामा घेऊन आलेत स्पर्धापरिक्षेला हलकंफुलकं कसं घ्यावं? यावर हलक्या फुलक्या गप्पांचा विशेष कार्यक्रम.

“UPSC, MPSC च्या पल्याडही भलं मोठं जग आहे; आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे…” या विषयावर आॅनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आज रविवारी संध्याकाळी ठिक सहा वाजता हॅलो महाराष्ट्र फेसबुक पेज, करिअरनामा फेसबुक पेज तसेच हॅलो महाराष्ट्र युट्यूब चॅनल येथे थेट प्रक्षेपित होणार आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाला अभिजीत निकम (Qualified for post of JSO/उपजिल्हाधिकारी, गोवा सरकार), स्वप्निल शेळके (संचालक, डेक्कन IAS), राजू केंद्रे (चेवनिंग स्कॉलर, युके सरकार; CEO, एकलव्य), पृथ्वीराज देशमुख (शेतकरी, राष्ट्रीय खेळाडू तसेच स्पर्धापरिक्षेचा विद्यार्थी), कोमल कलाने (स्पर्धापरिक्षा विद्यार्थिनी) आदी वक्ते सहभागी होणार असून तरुण पत्रकार योगेश जगताप हे संवादकाची भुमिका पार पाडणार आहेत. जास्तित जास्त तरुण तरुणींनी कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

???? नियोजीत वेळ : रविवार, 11 जुलै 201, संध्याकाळी 6 वाजता

⚓ खालील ठिकाणी आपण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहू शकता तसेच आपले प्रश्न आम्हाला कमेंट करुन विचारु शकता???????????????????????? ⚓

???? हॅलो महाराष्ट्र फेसबुक पेज : https://www.facebook.com/hellomaharashtra.in/

???? करिअरनामा फेसबुक पेज : https://www.facebook.com/careernama.official/

???? हॅलो महाराष्ट्र Youtube : https://youtube.com/c/HelloMaharashtra_TV

Leave a Comment