लालबागच्या राजाच्या मंडपात धक्काबुक्की; भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये बाचाबाची

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनानंतर म्हणजेच तब्बल २ वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. त्यातच मुंबईचा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी तर संपूर्ण राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे लालबाग म्हंटल की गर्दी आलीच. पण याच दरम्यान, दर्शन घेणारी एक महिला भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले. या घटनेन काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

यंदाही लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली आहे. त्याच दरम्यान, मुखदर्शनाच्या रांगेत असलेली एक महिला आणि काही महिला सुरक्षारक्षकांमध्ये हा वाद झाला. यावेळी सदर महिलेने महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केल्याचंही पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी उत्साहाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, आज संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव पार पडत आहे. कोरोना मुळे २ वर्ष गणेशोत्सवासाठी काही निर्बंध लादण्यात आले होते. मात्र आता तब्बल २ वर्षांनी सर्वत्र गणेश भक्तांनी अत्यंत उत्साहाने गणपतीचे स्वागत केलं आहे. प्रसिद्ध असलेल्या लालबाग राजाच्या दर्शानासाठीही दोन वर्षांनंतर अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.