पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीत फूट

शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडखोरी करत शक्तीप्रदर्शनाने अर्ज भरला

पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मतदारसंघ खिशात घालण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर येथे महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसत आहे.

महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाने बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बैलगाडीत बसून येत मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. सुरुवातीला येथे राष्ट्रवादी आणि भाजप अशी थेट लढत होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बंडघोरी केल्यानंतर आता शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी बैलगाडीत बसून येत मोठे शक्तीप्रदर्शन केले.

निकाल २ मे ला

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून ३० मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर ३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like