अपात्र आमदार प्रकरणाची आज होणार सुनावणी!! सत्तासंघर्षाची दिशा ठरणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी ठीक तीन वाजता अपात्र आमदार प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात करतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही गटाचे नोटीस बजावण्यात आलेले आमदार उपस्थित असतील. त्यामुळे आजच्या आजच्या सुनावणीचा निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना पक्ष फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे गटांनी एकमेकांविरोधात आमदार अपात्रतेची याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच आज सुनावणी पार पडत आहे.

आज होणारी सुनावणी एकनाथ शिंदे गटाच्या 40 आमदारांसाठी आणि उद्धव ठाकरे गटाच्या 14 आमदारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुख्य म्हणजे, ही नियमित सुनावणी असली तरी यामुळे राज्यातील पुढील सत्ता संघर्षाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे एकंदरीत आजच्या सुनावणीत सत्तासंघर्षप्रकरणी वेळापत्रक जारी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, या सुनावणीचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये देखील दिसून येऊ शकतो. परंतु त्यासाठी हा निकाल नक्की कोणाच्या बाजूने लागेल हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

यापूर्वी गेल्या 14 सप्टेंबर रोजी राज्यात अपात्र आमदारांच्या प्रकरणाची सुनावणी झाली होती. त्यावेळी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या मागणीवरून दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची वेळ दिली होती. परंतु यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राहूल नार्वेकर यांना सुनावणीसाठी दीर्घकाळ लावल्यामुळे फटकावले. तसेच, आमदार अपात्र प्रकरणाचे सुनावणी पुढील एका आठवड्यातच घ्यावी असे निर्देश देखील दिले. त्यानंतर नार्वेकर यांनी सुनावणीच्या कामांसाठी हालचाली करण्यास सुरुवात केली. मधल्या काळात या सुनावणी प्रकरणी तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी राहुल नार्वेकर दिलेला देखील गेले होते. त्यानंतरच दुसऱ्या दिवशी त्यांनी अपात्र आमदार प्रकरणाच्या सुनावणीची तारीख जाहीर केली. त्यानुसार, आज म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये पुढील सुनावणींचे वेळापत्रक जारी होण्याची शक्यता आहे.