धुळे : मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत डांबर कारखान्यांवर जिल्हा पोलीस अधिक्षकांची धडक कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

धुळे प्रतिनिधी । शहरात महिन्या भरा पासुन सतत चोरी सञ सुरु आहे. या करीता जिल्हा पोलीस अधिक्षक व अन्य पोलीस अधिकारीनी राञी गस्त घालुन चोरी सञावर नियंञण मिळविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात अवैध धंदे सुरु असल्याने ते त्वरीत बंद व्हावे , या करीता जिल्हा पोलीस अधिक्षक हे स्वतःच सक्रीय झाले आहे.

Untitled design (76).jpg

मंगळवारी शहरातील तीन किलो मीटर अंतरावर असलेल्या मोहाडी उपनगरातील आय.एस.ओ. मानांकन प्राप्त मोहाडी पोलीस ठाणे हद्दीतील अवधान औद्योगिक शिवारा जवळील ढाब्याच्या मोकळ्या जागेत अवैध रित्या डांबर तयार करण्याचा कारखाना सुरु झाल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक पांढरे यांना मिळाली. त्यांनी तातडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे आय एस सो मानांकन प्राप्त मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत ज्या ठिकाणी डांबर तयार करण्यासाठी साहित्य आणले होते, तिथे धडक कारवाई केली. त्यावेळी मोकळ्या जागेत एक ट्रक आणि इलेट्रिक मोटर व डांबर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवलेले दिसले. व अन्य साहित्यांसह तेथे असलेल्या तीन ते चार जणांना पोलीसांनी पळुन जाताना त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Untitled design (75).jpg

आय एस ओ मानांकन प्राप्त हद्दीत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी कारवाई केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणालेले आहे.परंतु हा माल कोणाचा ? जागा कोणाची ? कोणाच्या आशिर्वादाने हा व्यवसाय त्या हद्दीत सुरु होता ? हे प्रश्न अजुन अनुरुत्तीत आहे.

या अगोदर बिलाडी रोड जवळील स्टार्च फँक्टरी समोरील मैदानात अवैध रित्या अशाच प्रकारे धाड टाकुन डांबर तयार करण्याचा कारखाना हि उध्दवस्त करण्यात आला होता. रात्री उशीरा पर्यत आय एस ओ मानांकन प्राप्त मोहाडी पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केलेल्या कारवाई बाबत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

Leave a Comment