Divi’s Laboratories Limited च्या शेअर्सने गेल्या 19 वर्षांत गुंतवणूकदारांना बनवले कोट्यधीश

Divi’s Laboratories Limited
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजारात अशा काही कंपन्या आहेत ज्यामध्ये अवघ्या काही हजारांच्या गुंतवणूकीद्वारे भरपूर नफा मिळतो. अशा कंपन्यांच्या लिस्ट मध्ये Divi’s Laboratories Limited या भारतीय मल्टिनॅशनल फार्मास्युटिकल्स कंपनीचे नाव देखील सामील आहेत. गेल्या दोन दशकात या शेअर्सची आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. हे ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडियंट्स (API) आणि इंटरमीडिएट्सची उत्पादक आहे. गेल्या 19 वर्षांमध्ये या शेअर्सने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 408 पटीने वाढ केली आहे.

Divis Labs sheds 14% in two days, hits 52-week low post Q4 results | Business Standard News

Divi’s Laboratories Limited चे शेअर्स 12 सप्टेंबर रोजी NSE वर 2.11 टक्क्यांनी वाढून 3,679.00 रुपयांवर बंद झाले. मात्र, 13 मार्च 2003 रोजी, जेव्हा या शेअर्सचे NSE वर पहिल्यांदाच ट्रेडिंग करण्यास सुरुवात झाली तेव्हा त्याची किंमत फक्त 9 रुपये होती. तेव्हापासून, या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 40,777.78 टक्के इतका रिटर्न मजबूत दिला आहे.

Opinion | Where has all the money gone from the system? | Mint

गेल्या 5 वर्षात दिला 323 टक्के रिटर्न

Divi’s Laboratories Limited ने गेल्या 5 वर्षात गुंतवणूकदारांना 323 टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिला आहे. जर एखाद्याने 5 वर्षांपूर्वी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 4.23 लाख रुपये झाले असते. मात्र दुसरीकडे, गेल्या एका महिन्यात त्याचे शेअर्स सुमारे 1.42 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात त्याचा स्टॉक सुमारे 27.65 टक्क्यांनी घसरला आहे.

Watch out for the risks to your money- The New Indian Express

रिटर्नचा लेखाजोखा काय आहे???

जर एखाद्याने 13 मार्च 2003 रोजी यामध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याचे 4 कोटी 8 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्याने 13 मार्च 2003 रोजी यामध्ये फक्त 25 हजार रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य 1.02 कोटी रुपये होऊन तो करोडपती झाला असता. Divi’s Laboratories Limited

Divi's Laboratories Ltd - Finpedia

कंपनीविषयी जाणून घ्या

Divi’s Laboratories Limited ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान फार्मास्युटिकल कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय हैदराबाद, तेलंगणा येथे आहे. लार्ज कॅप कंपनी असलेल्या Divi’s ची मार्केटकॅप 97.65 हजार कोटी रुपये आहे. Divi’s Laboratories मध्ये Active Pharmaceutical Ingredients आणि Intermediates निर्मितीचा व्यवसाय आहे. याशिवाय, Divi’s Nutraceuticals या उपकंपनीद्वारे न्यूट्रास्युटिकल इंग्रिडियंट्सचे उत्पादन आणि पुरवठा देखील करते.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.divislabs.com/

हे पण वाचा :

Bank Holiday : सप्टेंबर महिन्याच्या उरलेल्या दिवसांत बँका 5 दिवस राहणार बंद, सुट्ट्यांची लिस्ट तपासा

Gold Price Today : आज सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे दर पहा

LIC च्या ‘या’ योजनेत दरमहा 45 रुपये जमा करून मिळवा 25 लाख रुपये

RBI कडून ‘या’ बँकेचे लायसन्स रद्द, आता खातेदारांच्या पैशांचे काय होणार ???

Car : CNG-हायब्रिड इंजिनमध्ये काय फरक आहे??? अशा प्रकारे समजून घ्या