#HappyDiwali | अवघ्या नऊ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. कपडे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, शोभेच्या वस्तू यांसह फराळासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी आता ग्राहकांची लगबग सुरू आहे. दुसरीकडे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनीही विविध योजना बाजारात आणल्या आहेत.
वर्षातील सर्वांत मोठा सण म्हणून दिवाळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षभर खर्चाला कात्री लावून प्रत्येकजण या सणासाठी पैसे जमवत असतो. भिशी, रिकरिंग, बोनस या माध्यमांतून येणारा पैसा सणासाठी आणि आनंदासाठी खर्च केला जातो. सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली, तिची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत होत असली तरी सर्वसामान्य नागरिकांकडून दिवाळीच्या प्राथमिक तयारीला सुरुवात झाली आहे. दिवाळी महिनाअखेरीस असल्याने नोकरदारांकडून पगार झाल्या-झाल्याच सणाची खरेदी सुरू आहे.
सणाची पहिली खरेदी होते ती कपड्यांनी.व्यावसायिकांपासून ते शोरूमपर्यंत सगळ्यांकडेच फॅशनेबल कपड्यांचे नवीन कलेक्शन आल्याने सध्या सर्वांत मोठा ग्राहकवर्ग आहे तो कपडेखरेदीला.बाजारपेठ मध्ये आकाशकंदील, विविध प्रकारच्या पणत्या आल्या आहेत व सर्वच ग्राहकांनी वस्तुंना