Diwali Special Train : दिवाळीनिमित्त आजपासून सुरु होणार ‘ही’ विशेष ट्रेन; पहा कोणत्या मार्गावरून धावणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अवघ्या 4 दिवसावर दिवाळी आली असून प्रत्येकाला आपल्याला घरी जाण्याची घाई आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांना याचा सामना करावा लागत असून प्रवाश्यांची गैरसोय होत आहे. हे लक्षात घेऊन आता मध्य रेल्वेने दिवाळीसाठी विशेष उत्सव ट्रेन (Diwali Special Train) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून म्हणजे 8 नोव्हेंबर ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. हि ट्रेन नेमकी कुठून धावेल याबाबत जाणून घेऊया.

सुरत – ब्रह्मपूर ई विशेष एक्सप्रेस सुरत ते ब्रह्मपूर अश्या आठ फेऱ्या करणार असून ब्रह्मपूर ते सुरत अश्या आठ फेऱ्या म्हणजेच एकूण 16 फेऱ्या होणार असल्याची माहिती आहे. ही गाडी (Diwali Special Train) आठवड्यातून एकदा असल्यामुळे यासाठी जागा राखीव ठेवता येईल. त्यामुळे नागरिकांना एक दिलासा मिळणार आहे. हे मात्र नक्की. मध्य रेल्वेची ही नवी उत्सव विशेष ट्रेन वर्धा, अकोला, भुसावळ, धरणगाव, विजयवाडा, नंदुरबार, जळगाव , अकोला, विजयनगर, वारंगल या ठिकाणाला भेट देऊन पुढचा टप्पा गाठणार आहे. त्यामुळे या रूट मध्ये येणाऱ्या प्रत्येक शहरातील प्रवश्याला ही सोय फायदेशीर ठरणार आहे.

8 नोव्हेंबर ते 27 डिसेंबरपर्यंत चालवली जाणार ट्रेन- Diwali Special Train

दिवाळीच्या सणानिमित्त सुरु करण्यात आलेली ही उत्सव ट्रेन येत्या 8 नोव्हेंबर पासून सुरु होऊन ती 27 डिसेंबर पर्यंत चालवली जाणार आहे. ही गाडी आठवड्यातून एकदा चालवली जाणार असून दर बुधवारी ही गाडी दुपारी 2:40 मिनिटाने सुरत येथून निघेल आणि ब्रह्मपूर येथे शुक्रवारी 1:15 मिनिटांनी पोहचेल. तर ब्रह्मपूर येथून शुक्रवारी या गाडीचा टाइम हा 3:30 चा असून सुरतला ही गाडी 1:45 मिनिटाला पोहचेल. यामुळे प्रवाश्यांना सणासुदीच्या काळात गर्दीचा सामना करावा लागणार नाही.

.