Diwali Special Train : दिवाळीसाठी सोडल्या जाणार ज्यादाच्या गाड्या; रेल्वेने घेतला मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी म्हणलं की नोकरीनिमित्त मुंबई- पुणे वा अन्य ठिकाणी नोकरीला असलेले कर्मचारी किंवा चाकरमानी आपल्या मूळ गावी आनंदाने जात असतात, परंतु सणासुदीच्या काळातील गाड्यांची वाढती गर्दी पाहता त्याचा हिरमोड होतो आणि कस बस घरी पोचण्याचा प्रयत्न चाकरणामी करत असतात. परंतु ह्यावेळी तुम्ही जर बाहेर गावी किंवा घरी जाण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. कारण प्रवाशांच्या सेवेसाठी आणि आरामदायी प्रवासासाठी रेल्वेने दिवाळीच्या सुट्ट्यात अधिकच्या गाड्या (Diwali Special Train) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता या गाड्या नेमक्या कुठून धावणार हे आपण जाणून घेऊया.

दिवाळी हा सण आपल्याला देशात धूमधडाक्यात साजरा केला जातो. त्यामुळे ह्या सणाला काय काय करायचं ह्याची प्लॅनींग ही आधीच झालेली असते. परंतु सर्वचजन ह्या काळात बाहेर पडत असल्यामुळे गर्दीचा लोट येतो. त्या लोकसंख्येचा विचार करून रेल्वेने निर्णय घेतला की, ह्या सुट्ट्यामध्ये अधिकच्या गाड्या सोडल्या (Diwali Special Train) जातील. त्यामुळे नागरिकांना सुखकर प्रवास करता येईल.

कोणत्या ठिकाणावरून जातील ह्या गाड्या? Diwali Special Train

सुट्ट्यामध्ये अधिकच्या सोडलेल्या गाड्या ह्या थिवी,  ठाणे, कणकवली,  संगमेश्र्वर, पनवेल, कुडाळ, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी, वैभववाडी, नंदगाव,  सिंधदुर्ग ह्यासारख्या ठिकाणावरून जाईल. लोकमान्य टर्मिनस ते थिवी ही गाडी आठवड्यातून तीन वेळेस धावते. मुंबई, कोकण  ह्यासारख्या ठिकाणी दिवाळीला नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे खालील गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

लोकमान्य टर्मिनस ते थिवी जाणारी ट्रेन क्रमांक 01129 –  ही गाडी लोकमान्य टिळक स्टेशनवरून 1 ते 29 नोव्हेंबरदरम्यान आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच बुधवार, शनिवार व सोमवार रात्री 10:15 मिनिटांनी सुटेल व थिवी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10  वाजता पोहोचेल. म्हणजे प्रवाश्यांना शांततेत प्रवास करता येईल.

त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 01130 थिवी ते लोकमान्य टर्मिनस ही गाडी सोडली जाईल. ही गाडी थिवीहून 2 ते 30 नोव्हेंबरमध्ये गुरुवार, रविवार व मंगळवार या दिवशी दुपारी 3 वाजता सोडली जाईल. आणि लोकमान्य टिळक स्थानकावर ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4.5 pm वाजता पोहोचेल.

ट्रेनमध्ये या सुविधा मिळणार :

लांबचा प्रवास करायचा म्हणजे गाडीमध्ये तशी सोय देखील असणे गरजेचे असते.त्याचप्रमाणे या ट्रेनमध्ये तुम्हाला  वातानुकुलित एसी डब्बे हे 1 -1 असे भेटतील. तर 2 टीयर एसी 2, 3 टीयर 4, आणि स्लिपर कोच मध्ये 2 तर जनरलचे डब्बे हे 10 एवढे असणार आहेत. त्यामुळे तुमचा प्रवास हा अत्यंत सुखकर होऊ शकतो. शिवाय गर्दीपासून तुम्ही बचावलेही जाऊ शकता.