DMart Q3 Results : DMart कडून तिसर्‍या तिमाहीचे निकाल जाहीर, नफा 23.6% वाढून ₹552.53 कोटी झाला

0
93
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । DMart नावाची रिटेल स्टोअर चेन चालवणाऱ्या Avenue Supermarts Ltd ने शनिवारी चालू आर्थिक वर्षाच्या (2021-22) तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 23.6 टक्के वाढ नोंदवली गेली. 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 552.53 कोटी रुपये होता.

परिचालन उत्पन्न 22.22 टक्क्यांनी वाढले
यासह, कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 446.95 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. BSE ला दिलेल्या सूचनेत, कंपनीने सांगितले की, मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 7,542 कोटी रुपयांच्या तुलनेत तिचे परिचालन उत्पन्न 22.22 टक्क्यांनी वाढून 9,217.76 कोटी रुपये झाले आहे.

कंपनीचा एकूण खर्चही या तिमाहीत 21.72 टक्क्यांनी वाढून 8,493.55 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 6,977.88 कोटी रुपये होता. एव्हेन्यू सुपरमार्ट्सचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नेव्हिल नोरोन्हा म्हणाले, “डी-मार्ट स्टोअर्सच्या उत्पन्नात तिमाहीत 22 टक्के वाढ झाली आहे. मात्र, एकूण मार्जिनमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे.”

झुनझुनवालाचे ‘गुरु’ राधाकिशन दमानी हे DMart चे संस्थापक आहेत
विशेष म्हणजे देशातील प्रसिद्ध अब्जाधीश राधाकिशन दमाणी हे DMart चे संस्थापक आहेत. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला, ज्यांना भारताचे वॉरन बफे म्हटले जाते, ते त्यांना आपले गुरू मानतात. फोर्ब्सच्या देशातील श्रीमंतांच्या यादीत दमानी चौथ्या क्रमांकावर आहेत. दमाणी हे रिटेल बिझनेसचे राजा मानले जातात. ते नेहमी पांढरे कपडे घालतात आणि शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांमध्ये ‘मिस्टर व्हाईट अँड व्हाईट’ म्हणून प्रसिद्ध आहेत.

त्यांनी 1980 च्या दशकात स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकदार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. 20 मार्च 2017 पर्यंत राधाकिशन दमाणी हे केवळ एका रिटेल कंपनीचे मालक होते, मात्र 21 मार्च रोजी सकाळी त्यांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची बेल वाजवताच त्यांच्या संपत्तीत 100 टक्क्यांनी वाढ झाली. वास्तविक, DMart चा शेअर 604.40 रुपयांवर लिस्टेड झाला होता, तर इश्यूची प्राईस 299 रुपये ठेवण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here