प्रसिद्ध अभिनेते आणि DMDK प्रमुख विजयकांत यांचे निधन; कोरोनाशी झुंज ठरली अपयशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सुप्रसिद्ध अभिनेते आणि तमिळनाडूमध्ये प्रतिष्ठित राजकीय नेतृत्व असणाऱ्या विजयकांत यांचे निधन झाले आहे. त्यांनी चेन्नईमध्ये वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. DMDK पक्षाचे संस्थापक विजयकांत यांच्या निधनाच्या बातमीमुळे सिनेक्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

काही वेळापूर्वीच असे वृत्त समोर आले होते की, विजयकांत यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. विजयकांत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती DMDK पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवरून देण्यात आली होती. मात्र काही तासांच्या अवधी मध्येच विजयकांत यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. या बातमीमुळे चहात्यांना कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, आता विजयकांत यांचे पार्थिव त्यांच्या घरी घेऊन जाण्यात आले आहे. त्यानंतर, अंत्यदर्शनासाठी DMDK च्या पक्ष कार्यालयामध्ये घेऊन जाण्यात येणार आहे. तिथून पुढे विजयकांत यांच्या अंत्यसंस्काराचा विधी पार पडेल. दरम्यान, कॅप्टन अशी ओळख असलेल्या विजयकांत यांनी तमिळनाडूतील फिल्म इंडस्ट्रीमध्ये अभिनयाची छाप सुटली होती. राजकिय क्षेत्रात सक्रिय असताना त्यांनी 154 सिनेमांमध्ये काम केले होते. त्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला होता.