हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोना सद्ध्या तोंड वासून उभा आहे. भितीदायक वातावरण त्याने निर्माण केले आहे. नवीन स्ट्रेन अधिक आक्रमकपणे आणि वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांमध्ये जवळपास तीन लाखांच्या आसपास रुग्ण आढळले असून 2 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यावरून हा विषाणू पसरण्याची तीव्रता लक्षात येते.
कोरोनाची लागण झालेले काही रुग्ण गंभीर चुका करताना आढळून आले आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी काही लोक पेनकिलर्स आणि अँटिबायोटिक्सच्या गोळ्याही खात आहेत. मात्र हा प्रकार तुमच्या जीवावरही बेतू शकतो. कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णामध्ये डोकेदुखी आणि अंगदुखीसारखी लक्षणे दिसून येत आहेत. अशा काळात काही रुग्ण डॉक्टरांचा सल्ला न घेता पेनकिलर्स घेताना दिसताहेत. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोळी घेऊ नका. घशात खवखव होणे, खोकला येणे आणि सर्दीमुळे छातीत कफ होणे हे देखील कोरोनाचे लक्षण आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने खोकल्यावरील औषध किंवा कफ सिरप घ्या. तसेच याचा ओव्हरडोस घेण्यापासून वाचा.
कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर अँटिबायोटिक्स गोळ्यांचे सेवन करताना दिसून आले आहेत. मात्र हे चूक आहे. याच्या ओव्हरडोसमुळे रिअॅक्शन होण्याचीच शक्यता जास्त आहे. काही लोक पारंपारिक औषधांचेही सेवन करत आहेत. मात्र हे करत असताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशनच्या अहवालानुसार कोरोना काळात शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी योग्य आहार, ताजी फळं, जीवनसत्वे आणि फायबरचे प्रमाण जास्त असणारा आहार गरजेचा आहे. पाण्याचे प्रमाण संतुलित राहणे आवश्यक आहे. ज्यूस यांचे सेवन करावे. यामुळे आपले आरोग्य चांगले राहणार आहे.