चहासोबत चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; होईल मोठं नुकसान

tea
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चहा म्हंटल तर आपला अगदी आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. दररोजच्या सकाळची सुरुवात आपण चहानेच करतो. काही जणांना तर चहासोबत बिस्कीट, खारी आणि टोस्ट खाण्याची सवय असते. परंतु काही जण चहा सोबत असेही काही पदार्थ खातात ज्यामुळे आपले बिगडू शकते आणि आपल्या आरोग्याला नुकसान होण्याची शक्यता असते. आज आपण जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे आपण चहा सोबत खाऊ नये ….

1) लिंबू-

चहा पीत असताना त्यासोबत लिंबापासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन करणे शरीराला हानिकारक ठरू शकते. लिंबाच्या रसात अॅसिडिक घटक आढळतात त्यामुळे तुम्हाला गॅसची समस्या, जळजळ किंवा अॅसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत चहासोबत लिंबू चुकूनही खाऊ नका.

2) चहासोबत मसालेदार स्नॅक्स खाऊ नका –

चहा पीत असताना त्यासोबत तिखट कुरकुरे, शेंगदाणे, नट यासारख्या गोष्टी खाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतात. चहासोबत कोणताही खारट पदार्थ शरीराला उलट रिअक्शन देते. त्यामुळे तुमच्या शरीराला समस्या निर्माण होतात. वास्तविक, चहामध्ये टॅनिन आढळतात जे लोह आणि इतर पोषक घटकांचे शोषण रोखतात.

3) हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या या आरोग्याला उपयुक्त असता परंतु याच भाज्या जर तुम्ही चहासोबत खात असाल तर मात्र तुमच्या शरीरात गडबड होण्याची शक्यता आहे. चहासोबत या भाज्या खाल्ल्यास यातील पोषक तत्त्वे शरीराला मिळणार नाहीत. चहासोबत हिरव्या भाज्यांचे सेवन टाळावे.

4) बेसनापासून तळलेले पदार्थ –

चहासोबत बेसनापासून तळलेले पदार्थ खाऊ नयेत. बेसनामध्ये असे काही घटक आढळतात जे चहाच्या विरोधात रिअक्शन करतात आणि त्यामुळे तुमच्या पचन संस्थेला समस्या होण्याची शक्यता असते. आणि ज्यामुळे ते पचत नाही.

5) दही खाऊ नये –

चहा आपण दुधापासून बनवतो, त्यामुळे त्यासोबत दही खाऊ नये. कारण जर आपण दह्यासोबत दुधापासून बनवलेल्या गोष्टी खाल्ल्या तर त्यामुळे पोटात गॅस, जळजळ आणि अॅसिडिटी सारख्या समस्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे दूध आणि दही एकत्र खाणं टाळा.