इन्कम टॅक्स रिटर्न भरताना या 5 चुका नक्की टाळा!! भविष्यात येणार नाही कोणतीही अडचण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरले नाही तर दंड आकारला जाणार आहे. या कारणामुळेच सध्या करदाते ITR भरण्यासाठी घाई करत आहेत. परंतु ही घाई करत असतानाच करदात्यांकडून पुढील चुका देखील होऊ शकतात. या चुकांमुळे त्यांना आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे ITR भरताना पुढील चुका आपल्या बाबतीत होणार नाही याची काळजी घ्यावी.

1) ITR फॉर्ममध्ये चुकीची वैयक्तिक माहिती भरणे – ITR दाखल करताना चुकीची माहिती भरू नये. वैयक्तिक वा कोणतीही माहिती भरताना करदात्याने मूल्यांकन वर्ष निवडले पाहिजे. चुकीचे मूल्यांकन वर्ष निवडल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. हा फॉर्म भरताना व्यवस्थित काळजी देऊन तो भरावा. कारण कोणतीही माहिती चुकीची भरल्यास तुमचे रिटर्न नाकारले जाऊ शकते.

2) चुकीच्या ITR फॉर्मची निवड – जर करदात्याने योग्य ITR फॉर्म निवडला नाही तर त्याचे नुकसान होऊ शकते. लक्षात घ्या की, आयकर विभागाचे आयटीआर फॉर्म विविध प्रकारचे असतात. करदात्याने स्वत:साठी योग्य आयटीआर फॉर्म निवडणे महत्त्वाचे आहे. जर करदात्याला यात अडचण येत असेल तर तो एखाद्या तज्ज्ञाची मदत घेऊ शकतो.

3) उत्पन्नाच्या सर्व स्रोतांची माहिती न देणे – अनेक करदाते फॉर्म भरताना त्यांच्या उत्पन्नाच्या मुख्य स्त्रोताविषयी माहिती देतात. परंतु, बचत खात्यात जमा केलेल्या पैशांवरील व्याज, भाड्याचे उत्पन्न इत्यादी माहिती ते देत नाहीत. परंतु, करदात्यांनी त्यांच्या रिटर्नमध्ये प्रत्येक लहान आणि मोठे उत्पन्न लिहायला हवे.

4) परताव्याची पडताळणी न करणे – आयकर विवरणपत्र भरल्यानंतर त्याची पडताळणी करणे बंधनकारक आहे. असे न केल्यास तुमचा रिटर्न आयकर अधिकाऱ्यांकडून विचारात घेतला जात नाही. यामुळे तुमची सगळी मेहनत वाया जाते. त्यामुळे रिटर्न भरताना त्याची पडताळणी करावी.

5) फॉर्म 26AS च्या डेटाकडे दुर्लक्ष करणे – फॉर्म 26AS मध्ये करदात्यांच्या TDS आणि TCS बद्दल माहिती असते. हे तुमच्या स्वतःच्या रेकॉर्डशी जुळणे महत्त्वाचे आहे. तुम्ही असे न केल्यास तुम्हाला याचा फटका बसू शकतो. जर तुम्ही पगारदार करदाते असाल तर फॉर्म 16 चा डेटा फॉर्म 26AS च्या डेटाशी जुळवा.