अर्ध्यावरच डाव मोडला म्हणण्याची संधी आम्हाला देवू नका; दानवेंचा ठाकरे सरकारला खोचक सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । ”तुमचा अमर, अकबर,अँथनीचा संसार चांगला चालवा. अन्यथा अर्ध्यावरच डाव मोडला असे म्हणण्याची संधी आम्हाला देवू नका” असा कोचक सल्ला भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारला दिला. राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जालन्यात सर्वपक्षीय नागरिक सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला त्यावेळी दानवेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत भाषणातून फटकेबाजी केली.

तीन चाकी सरकार जास्त काळ टिकणार नसल्याची टीका भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आली असताना दानवेंनी यात उडी घेतली. चित्रपट, राजकारण आणि क्रिकेटमध्ये आपल्याला संधी मिळावी असे सर्वांचं वाटत असते. मात्र चित्रपटात रिटेक करता येतो तर क्रिकेटमध्ये सुद्धा सराव करता येतो. पण राजकारणात असे होत नसते .कारण येथे जसा बॉल आला तसा टोलावा लागतो, असे म्हणत दानवेंनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

दरम्यान ”मला दुचाकी चालवण्याची सवय नाही, पण सध्या तीनचाकी कार नाही पण सरकार चालवतो आह” असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित सरकार स्थापन केल्याने भाजपच्या नेत्यांकडून वारंवार टीका केली जात आहे. तसेच हे सरकार टिकणार नाही असा वारंवार दावा विरोधक करताना दिसतात. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या या टिकेला उत्तर दिलं.