‘राष्ट्रवाद’ म्हणजे हिटलर आणि नाझीवाद, म्हणून यांचा वापर करू नका! – सरसंघचालक मोहन भागवत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी रांचीतील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादाबद्दल विधान केले आहे. त्यांनी आपल्या इंग्लंड प्रवासातील एक घटना यावेळी सांगितली. मोहन भागवत यांनी सांगितले की, ”यूकेमध्ये आरआरएस कार्यकर्त्यांशी संभाषणा दरम्यान मला हे समजले की संभाषणातील शब्दांचे अर्थ भिन्न असतात. म्हणून तुम्ही नॅशनॅलिझम शब्द वापरू नका. नेशन म्हटलं तर चालेल, नॅशनलही चालेल, नॅशनॅलिटी म्हटलं तरीही चालेल परंतु, नॅशनॅलिझम म्हणू नका!, कारण नॅशनॅलिझमचा अर्थ हिटलर, नाझीवाद, फॅसिझम होतो. अशाप्रकारेच शब्दांमध्ये बदल झाला आहे.

मोहन भागवत आपल्या भाषणा दरम्यान म्हणाले, “पाहायला गेलं तर देश महासत्ता होऊन काय करतात? संपूर्ण जगावर त्याचे वर्चस्व प्रस्थापित करतात. जगातील सर्व साधनांचा स्वत: साठी उपयोग करतात. संपूर्ण जगावर आपली राजकीय सत्ता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात कायम राहावी म्हणून ते प्रयत्न करतात. संपूर्ण जगावर स्वतःचाच रंग चढवण्याचा प्रयन्त करतात. हेच सर्व चालत आणि चालत आहे, आणि म्हणूनच जगातील विद्वान लोकांना असं वाटते की राष्ट्र वाढवणे ही जगासाठी धोकादायक बाब आहे.

ते पुढे म्हणाले, “राष्ट्रवाद” या शब्दाचा आजच्या जगात फारसा चांगला अर्थ घेतला जात नाही आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी संघाच्या योजनेतून यूकेला गेलो होतो, तेव्हा तेथील विचारवंतांशी मी बोलत होतो. संघाविषयी ४०-५० निवडक लोकांची चर्चा होत होती, तेव्हा त्यांचे कार्यकर्ते म्हणाले की, शब्दांच्या अर्थाविषयी सावधगिरी बाळगा, इंग्रजी आपली भाषा नाही आणि आपण पुस्तकात जे वाचले त्यानुसार आपण बोलू शकता. पण संभाषणातील शब्दांचा अर्थ बदलत असतो. म्हणून नॅशनॅलिझम हा शब्दवापरू नका. कारण नॅशनॅलिझमचा अर्थ हिटलर, नाझीवाद, फॅसिझम होतो. अशाप्रकारेच शब्दांमध्ये बदल झाला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment