हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गर्भावस्था ही महिलांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. यामध्ये महिलांना अनेक दिव्यांना सामोरे जावे लागते. खाण्यापिण्यापासून ते चालण्या व झोपण्यापर्यंत हे दिव्य अनुभवावे लागते. बऱ्याच वेळा गर्भावस्थेत झोप गायब होऊन जाते. यावेळी मोठी समस्या येते. तुम्हालाही किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला गर्भावस्थेत झोप येत नसेल तर आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.
गर्भावस्थेत महिलांना लघवी वारंवार येत असल्यामुळे खूपदा त्यांची झोपमोड झाल्यामुळे परत लवकर झोप येत नाही. त्यामुळे पित्त वाढ होऊन चिडचिड होते. गर्भावस्थेतील हार्मोन्स असंतुलित होतात आणि त्यामुळे झोपेची समस्या कायमची होऊन जाते. यामुळे याची जाणीव राहू द्यावी. झोपताना खूप जास्त पाणी पिऊ नये जेणेकरून सारखे लघवीला जाण्याची गरज लागेल. शक्यतो रात्री लवकर जेवण करून टघेने गरजेचे आहेत. त्यानंतर दोन ते तीन तासांनी झोपावे.
रात्री झोपताना टिव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांच्यापासून दूर राहिले पाहिजे. झोपण्याची एक वेळ ठरवल्यावर हळूहळू सवय लागू शकते. दररोज झोपताना पुस्तक वाचण्याची किव्वा संगीत ऐकण्याची सवय लावण्याने मोठा उपयोग होणार आहे. गरम तापमानामध्ये लवकर झोप येत नाही त्यामुळे तुमचे तापमान कमी ठेवल्याने चांगली झोप मिळू शकेल. रात्री उशिरा गोड, कॉफी, चहा घेणे टाळा. यामुळे तुमची झोप पळून जाण्याची शक्यता जास्त आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’