31 मार्चपूर्वी हे कामे करून घ्या; भविष्यातील नुकसान टाळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 1 एप्रिलपासून नवीन वित्तीय वर्ष सुरू होणार आहे. यामुळे आपण 31 मार्च पूर्वी आपले महत्त्वाचे कामे उरकून घ्या. नाहीतर यामुळे आपणाला मोठे नुकसान होऊ शकते. नवीन वित्तीय वर्षामध्ये काही गोष्टीमध्ये बदल होण्याचे अंदाज आहेत. या गोष्टींमध्ये PNB, PM किसान योजना आणि विविध योजनांचा समावेश आहे. या गोष्टींबद्दल डिटेल मध्ये पाहू.

विवाद पासून विश्वास योजनेची शेवटची तारीख ही 31 मार्च ही आहे. या योजनेमार्फत सरकार प्रलंबित करांच्या विवादामध्ये निर्णय घेते. PNB बँकेने ग्राहकांना सूचित केले आहे की, 31 मार्च नंतर बँकेचे जुने IFSC कोड काम करणार नसून त्यापुढे नवीन कोड टाकण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या KCC ला प्रोत्साहन देण्यासाठी आणि डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी 31 मार्च पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामधून किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज करता येईल.

स्वस्तात गृह कर्ज मिळण्यासाठी मार्च मध्येच अर्ज करा. 31 मार्च पर्यंत खाजगी बँका स्वस्तात गृहकर्ज देत आहेत. कोटक महिंद्रा, एचडीएफसी, SBI या बँका स्वस्तात गृहकर्ज देत आहेत. FD वर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त व्याज मिळणार आहे. याचीही मुदत 31 मार्च पर्यंत आहे. सोबतच, GST रिटर्न फाईल करण्याची मुदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. तसेच, पॅन कार्डला आधार कार्ड जोडण्याची मुदत ही 31 मार्च पर्यंत वाढवली आहे. त्यानंतर आपले पॅनकार्ड आधारसोबत लिंक केले नाही तर आपले कार्ड निष्क्रिय केले जाणार आहे. त्यामुळे वरील सर्व गोष्टी 31 मार्च पर्यंत करून घ्या आणि नुकसान टाळा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.