या पद्धतीने तुम्हाला मिळू शकेल गॅस सिलेंडर मागे 100 रुपये सूट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | गॅसचे भाव गगनाला भिडले असताना, गेल्या दोन महिन्यांमध्ये सिलेंडरच्या किंमतीत सव्वाशे रुपयांनी वाढ झाली. अशा परिस्थितीमध्ये लोकांना थोडीशी राहत देण्यासाठी पेटीएम डिजिटल पेमेंट कंपनीने शंभर रुपयापर्यंत गॅस सिलेंडर मागे सूट देण्याची योजना आणली आहे. यामध्ये तुम्हाला शंभर रुपये सूट सह 819 रुपयांना गॅस सिलेंडर मिळू शकणार आहे. तुम्हाला या कॅशबॅकसाठी पेटीएम ॲपसह पैसे द्यावे लागतील.

पेटीएमने ऑफर बद्दल माहिती देताना सांगितले आहे की, गॅस सिलेंडरची रक्कम तुम्ही पेटीएम पेमेंटने भरली तरच तुम्हाला 100 रुपयापर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. आपण पैसे भरताच कॅशबॅकसाठी स्क्रॅच कार्ड येईल. स्क्रॅच कार्ड उघडल्यास त्यामध्ये आपल्याला आपली कॅशबॅकची रक्कम समजणार आहे. पहिल्यांदाच पेटीएमवरून सिलेंडर बुक करणाऱ्यांनाच ही खास ऑफर मिळणार आहे.

या ऑफरचा फायदा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पेटीएम ॲप डाऊनलोड करा. यानंतर ‘रिचार्ज आणि पे बिलस’वरती जा. आता ‘बुक सिलेंडर’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या गॅस सिलेंडरची कंपनी निवडा. रजिस्टर मोबाईल नंबरवर आपला एलपीजी आयडी टाकल्यानंतर, पेमेंट पर्याय येईल. त्यानंतर पेमेंट करा. त्यानंतर आपल्याला स्क्रॅच कार्ड मिळणार आहे. त्यावरून किती कॅशबॅक मिळाला हे तुम्हाला समजू शकेल. पेटीएमपेटीएमने ही ऑफर 31 मार्च पर्यंतच ठेवली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment