व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एक रेल्वे – एक हेल्पलाईन नंबर ! सर्व समस्यांसाठी यापुढे एकच हेल्पलाईन नंबर

नवी दिल्ली | भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोईसाठी संपूर्ण देशभरामध्ये एकच हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. यामुळे कोणत्याही समस्येसाठी आता यापुढे एकच नंबर डायल करावा लागणार आहे. रेल्वेने आपल्या सर्व हेल्पलाईन जश्या 182 आणि 138 यांना मर्ज करून नवीन 139 हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे.

रेल्वे मंत्रालयाने ट्विट करून नवीन हेल्पलाईन 139 बद्दल माहिती दिली आहे. यामध्ये लिहले होते की, आजपासून 138 आणि 182 या हेल्पलाईनला मर्ज करून नवीन 139 हा हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे. यापुढे रेल्वेच्या कोणत्याही सुविधेसाठी यापुढे एकच नंबर डायल करावा लागणार आहे. यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टळण्यासाठी मोठी मदत होईल.

नवीन हेल्पलाइन नंबर 139 वरून आपल्या भाषेमध्ये माहिती मिळणार आहे. देशातील 12 भाषेमध्ये या हेल्पलाइन नुंबरवरून माहिती मिळणार आहे. ट्रेनची वेळ, टाइम टेबल, सुरक्षा, पार्सल, मेडिकल मदत, स्टेशन कंप्लेंट, PNR, भाडे, बुकिंग, केटरिंग, भ्रष्टाचार, दुर्घटना अश्या विविध समस्यांवर या हेल्पलाईन नंबरवर माहिती मिळू शकणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.