हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपण निरोगी राहण्यासाठी एक्सरसाइज, डायट प्लान तयार करत असतो. त्याचबरोबर डाएट मध्ये आपण चपाती खाण्याकडे जास्त लक्ष देतो. चपाती मधून प्रोटीन भेटत असले तरीही जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने चपाती बनवत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी जास्त हानिकारक आहे. बऱ्याच ठिकाणी चपाती बनवण्यासाठी पीठ मळल्यानंतर ती तव्यावर टाकली जाते. त्यानंतर ती एका साईडने व्यवस्थित भाजल्यानंतर गॅसच्या फ्लेमवर ठेवून फुललेली चपाती बनवली जाते. परंतु ही पद्धत अत्यंत चुकीची असून याचा घातक परिणाम आपल्या आरोग्यावर पडू शकतो.
पर्यावरण विज्ञान आणि प्रायोगिक जर्नलच्या एका रिसर्च मध्ये उघड झाले आहे की, नॅचरल गॅस स्टोव्ह मधून कार्बन मोनो ऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, आणि काही सूक्ष्म कण निघतात. हे सूक्ष्म कण बॉडी साठी अत्यंत घातक असून यातून श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो यासोबतच हृदयविकार आणि कॅन्सर होण्याची देखील शक्यता असते.
न्यूट्रिशन अँड कॅन्सर जर्नल च्या का रिसर्च मधून उघड झालं होतं की, जास्त फास्ट आचेवर अन्न शिजवल्यामुळे त्यामध्ये कार्सिनोजन्स निर्माण होतात. आणि ते वेगवेगळ्या अवयवांना हानी पोहोचवतात. एलपीजी गॅसवर जेवण बनवणं हे आरोग्य सह पर्यावरणासाठी देखील हानिकारक असून पर्यावरणाचा विचार केल्यास गॅसवर जेवण बनवल्यामुळे पाच पट हवा प्रदूषित होते. त्यामुळे एलपीजी गॅस न वापरता इंडक्शन किंवा विजेवर चालणारी शेगडी वापरल्यास याचा धोका कमी होतो.