हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या संपूर्ण जगभरात मोबाईलचे व्यसन वाढलं आहे. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला मोबाईल हवाहवासा वाटतोय. अनेकांना तर मोबाईल हातात नसेल तर करमतच नाही. त्यातच काहीजण तर चक्क टॉयलेटला जातानाही मोबाईल घेऊन जातात. तुम्ही सुद्धा असं करत असाल तर वेळीच सावध व्हा. टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने तुम्ही आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना बळी पडू शकता. चला जाणून घेऊया या सवयीचा तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो.
टॉयलेट म्हणजे घाण.. ते जंतू आणि जिवाणूंचे घर आहे त्याठिकाणी बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असते. टॉयलेटला गेल्यांनतर आपण हात स्वच्छ करतो, परंतु जर तुम्ही मोबाइल घेऊन टॉयलेटला जात असाल आणि हात सॅनिटाइज न करता वापरला तर तुम्हाला संसर्ग होऊ शकतो.
मोबाईल घेऊन टॉयलेट ला गेल्याने मूळव्याधाची समस्या निर्माण होऊ शकते. कारण जेव्हा तुम्ही फोन घेऊन टॉयलेटमध्ये जाता तेव्हा तुमचा बराच वेळ जातो. यामुळे, तुम्ही गुदद्वारावर (Rectum) अनावश्यक ताण पडतो आणि नंतर ते मूळव्याधीसारख्या आजाराचं कारण बनतं. त्यामुळे मोबाइलला घेऊन टॉयलेटमध्ये जाऊ नका.
टॉयलेट मध्ये मोबाइल घेऊन गेल्यास तेथील बॅक्टेरिया हातांद्वारे तुमच्या पोटात पोहोचतात. त्यामुळे डायरिया, यूटीआय आणि पचनाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने फोनच्या स्क्रीनद्वारे हा बॅक्टेरिआ आपल्या शरीरात पोहोचतो.