हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या राज्यात तांदूळ खाणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. अनेकजण दिवसातून दोन वेळा तरी नक्कीच भात खातात. त्यात मग तो भात शिळा असो किंवा ताजा. भातामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, व्हिटामीन आणि खनिज अशी अनेक पोषक तत्वे असल्यामुळे भात खाणे चांगले असते. परंतु हाच भात आपल्या शरीरासाठी हानिकारक देखील ठरतो. त्यात तुम्ही शिळा भात खात असाल तर त्याने तुमच्या शरीराचे जास्त नुकसान होते. भात खाल्याने आरोग्याशी संबंधित अनेक आजार उद्भवू शकतात. तसेच, ब्लड शुगर देखील वाढत जाते. त्यामुळे शिळा भात खाणे सहसा टाळावेच.
तुम्ही जर शिळा भात किंवा 2 दिवस उरलेला भात खात असाल तर त्याने तुमच्या शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. शिळा भात खाल्याने डायरिया, जुलाब, उलटी यांसारख्या समस्या नक्कीच उद्भवू शकतात. तसेच, हृदयासंबंधित आजार देखील निर्माण होऊ शकतात. शिळा भात खाल्याने ब्लड शुगरचे प्रमाण देखील वाढते. इतकेच नव्हे तर, लठ्ठपणा वाढण्याचे एक कारण म्हणजे, शिळा भात खाणे असते. शिळ्या भातात बॅक्टेरियाजचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पोटात इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो.
समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, शिळा भात फूड पॉयजनिंग होण्याचे मुख्य कारण ठरू शकते. तसेच, त्यामुळे पोटाचे विकार देखील होऊ शकतात. शिळा भात खाल्याने माणूस आळशी देखील होत जातो. शिळ्या भातातून माणसाला सुस्ती येते. त्यामुळे कधी ही शिळा भात खाणे टाळावे. तसेच, लहान मुलांना शुगर असलेल्या व्यक्तींना शिळा भात खाण्यास कधी ही देऊ नये.