हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतामध्ये जेसीबी ला खूप महत्त्व प्राप्त आहे. ‘जेसीबीची खुदाई’ पाहण्यासाठी अनेक लोक आपल्या कामातला वेळ काढून पाहायला थांबतात. त्यामुळे त्यावर वेगवेगळे मीम आणि जोक ही पहायला मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का, की जेसीबीच्या मशीनला काय नाव दिले गेले आहे? ज्यावर जेसीबी असे लिहिलेले असते. तुम्हाला माहिती नसेल तर, ही माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. जाणून घ्या जेसीबी मशिनचे खरे नाव काय आहे.
खरेतर जे लोक मशीनला जेसीबी म्हणतात ते चूक आहे. कारण, जेसीबी हे मशीन तयार करणाऱ्या कंपनीचे नाव आहे. जर मशीन तयार करणाऱ्या कंपनीचे नाव जेसीबी असेल तर मशीनचे नाव काय असेल? असा प्रश्न अनेकांना पडतो. तर त्या वाहनाचे नाव हे Backhoe loader म्हणजेच बॅकहो लोडर असे आहे. ऐकून आश्चर्य झाले ना? पण हे खरे आहे.
जेसीबी इंडिया या कंपनीची देशामध्ये पाच फॅक्टऱ्या असून एक डिझाईन सेंटर आहे. जेसीबी ग्रुपची सहावी फॅक्टरी गुजरातच्या वडोदरा शहारामध्ये सध्या बनत आहे. जेसीबी कंपनीने भारतामध्ये बनवलेल्या या मशीन्स 110 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केल्या जातात. जेसीबीचे देशामध्ये 60 पेक्षा जास्त डीलर्स आणि सातशे पेक्षा जास्त आउटलेट आहेत. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रॉडक्ट असतात. या प्रॉडक्टमध्ये बॅकहो लोडर, कॉम्पॅक्टर, एक्सवेटोर जनरेटर, मिनी एक्सवेटोर, स्कीड स्टीर लोडर्स इत्यादी सामील आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’