हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या सर्वांनाच मध खायला जास्त आवडते. मधामध्ये जास्त पौष्टिक तत्व आढळत असल्यामुळे खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देखील दिला जातो. मध आरोग्यासाठी देखील फायदेशीर असल्यामुळे मधाचे सेवन दररोज करण्यावर अनेकांचा भर असतो. मधात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ६, कार्बोहायड्रेट, अमीनो ऍसिड अशी अनेक पौष्टिक तत्व असतात. या कारणामुळेच मध गुणकारी ठरते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का मध जितके फायदेशीर आहे तितकेच ते शरीरासाठी तोट्याचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या कारणासाठी मध्य शरीराला तोट्याचे ठरू शकते.
रक्तातील साखर वाढणे – मधाचे अति प्रमाणात सेवन केल्यास ते आपल्या शरीरावर दुष्परिणाम करू शकते. तसेच मधामुळे रक्तातील साखर देखील वाढते. शुगर असलेली लोक साखरे ऐवजी जास्त प्रमाणात मध खाण्यावर भर देतात. परंतु त्यांना हे माहीत नसावे की मधाचे जास्त सेवन केल्यास रक्तातीलच साखर वाढते. मधामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील साखर जलद गतीने वाढते. त्यामुळे इथून पुढे शुगर असणाऱ्या व्यक्तींनी नक्कीच मधाचे सेवन करताना विचार करावा.
पोटाचे विकार – तुम्हाला जर बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्ही नक्कीच मधाचा अगदी कमी प्रमाणात वापर करावा. मधाचे अतिरिक्त सेवन झाले की त्याचा परिणाम पचनावर दिसून येतो. आणि पचन नीट न झाल्यामुळे पोटाचे विकार निर्माण होतात. मधाचे जास्त सेवन केल्यानंतर पोटदुखीचा देखील त्रास होऊ शकतो. त्यामुळे कधीही पोटाचे विकार असणाऱ्या व्यक्तींनी मधाचे सेवन जास्त प्रमाणात करणे टाळावे.
वजन वाढते – अनेकजण वजन कमी करण्यासाठी साखरेचा वापर करणे टाळतात आणि त्या जागी मधाचा वापर करण्यास सुरुवात करतात. मात्र मधाचे देखील आहारात जास्त सेवन झाले की वजन वाढते. जास्त प्रमाणात मधाचे सेवन करणे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर मधाचे सेवन आहारात कमीच ठेवा.
फूड पॉयझनिंग – सध्या बाजारात मध विक्रीच्या अनेक नवनवीन कंपन्या आल्या आहेत. या कंपन्या मधामध्ये भेसळ करून ते मध बाजारात विकतात. अशा मधाचे सेवन केल्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते. फूड पॉयझनिंग शरीरावर सर्वात वाईट परिणाम करते यामुळे त्याचा त्रास आपल्याला होतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या कंपनीचे मत आहारात घेत आहात ते देखील तितकेच महत्त्वाचे असते.
दातांच्या समस्या – मधाचे जास्त सेवन केले की दात दुखून येतात. मध हे घट्ट असते तसेच ते गोड देखील असते. त्यामुळे मधाचे जास्त सेवन केले की दात दुखणे. यामुळे कधीही मधाचे सेवन जास्त प्रमाणत करू नये.