हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गेल्या 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतूचे (Atal Setu) उद्घाटन करण्यात आले आहे. हा सेतू सागरी पुलांमध्ये सर्वात लांब असणारा वाहतुकीसाठीचा महामार्ग आहे. अटल सेतू हा मुंबईतील शिवडी येथून सुरू होऊन नवी मुंबईतील चिर्ले येथे संपत आहे. मोदी सरकारकडून बांधण्यात आलेल्या या अटल सेतूमध्ये अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. हीच वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेणार आहोत.
(Atal Setu) अटल सेतू या पुलाचे काम देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आले होते. या सेतूसाठी 17,840 कोटींहून पैसा खर्च करण्यात आला आहे. या सेतूच्या मदतीने आपण नवी मुंबई ते मुंबई हे अंतर अवघ्या वीस मिनिटांमध्ये पूर्ण करू शकतो. या सेतूची लांबी तब्बल 21.8 किलोमीटर आहे. तसेच हा सेतू 6 लेनचा आहे. खास म्हणजे, अटल सेतू बनवण्यासाठी विशेष अशा टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे.
1) अटल सेतू 6.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप सहन सहन करण्याची ताकद ठेवतो. या सेतूमध्ये आयसोलेशन बेअरिंगचा वापर करण्यात आला आहे. देशामध्ये भूकंप झाला तर हा सेतू भक्कम राहावा अशा पद्धतीने त्याचे बांधकाम करण्यात आले आहे.
2) अटल सेतू उभारताना त्यामध्ये नॉईज बॅरिअर्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच सायलेन्सर देखील बसवण्यात आले आहे. त्यामुळे आवाज कमी होण्यास मदत होईल. या सेतू वरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना आवाजाचा त्रास होणार नाही.
3) अटल सेतू (Atal Setu) बांधकामांमध्ये इको फ्रेंडली लाइटिंग वापरली गेली आहे. या सेतुत एलईडी लाईट वापरण्यात आले आहेत.
4) अटल सेतूवर MTHL वर ओपन रोड टोलींग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे टोल नाक्यावर ज्या लांब रांगा दिसतात त्या या सेतुवर आपल्याला दिसणार नाहीत.
5) खास म्हणजे या सेतूवर रिअल-टाइम माहिती देण्यासाठी काही अंतरावर डिस्प्ले लावण्यात आले आहेत. या डिस्प्लेवर वाहतूक कोंडी किंवा अपघाताची माहिती देण्यात मिळेल.
6) अटल सेतू (Atal Setu) साठी ध्वनी आणि कंपने कमी करण्यासाठी रिव्हर्स सर्कुलेशन रिग्स तंत्रज्ञान प्रणाली वापरण्यात आली आहे. ज्याने सागरी जीवांचे देखील संरक्षण होईल.