वित्तीय तूट म्हणजे काय? त्याचा अर्थसंकल्पाशी काय संबंध आहे ते समजून घ्या

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 2022 23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशातील जनतेला अनेक सुविधा देण्यासाठी अर्थसंकल्प सादर केला जातो. ज्यामध्ये जनतेच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. अर्थसंकल्प सादरीकरणाचा दिवस हा वर्षातील तो दिवस असतो जेव्हा लोकं वित्तीय तूट, निर्गुंतवणूक, भांडवली नफा कर, पुनर्भांडवलीकरण यासारखे शब्द ऐकतात. यातील वित्तीय तूट (Fiscal Deficit) हा असा शब्द आहे जो अर्थसंकल्प सादर करताना तुम्ही अनेकदा ऐकला असेल.

आज आपण वित्तीय तुटीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. वित्तीय तूट म्हणजे सरकारचे एकूण उत्पन्न आणि खर्च यातील तफावत म्हणा किंवा खर्च भागवण्यासाठी सरकार किती पैसे कर्ज घेणार ती रक्कम म्हणजे वित्तीय तूट.

त्याबद्दल जाणून घ्या
वित्तीय तूट देशाच्या आर्थिक स्थितीचे खरे चित्र दाखवते. तज्ज्ञांच्या मते भारत पुढील आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट जीडीपीच्या 6.3 टक्के ते 6.5 टक्के ठेवू शकतो. भारतात कोरोना विषाणू संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. Omicron या नवीन व्हेरिएन्टमुळे ग्राहक आणि व्यावसायिक खर्चावर परिणाम होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता पुढील आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट 30 ते 50 बेसिस पॉइंट्सने कमी करण्याची योजना आहे.

काही तज्ज्ञांचे असे मत आहे की, वित्तीय तूट लक्ष्य गाठण्यापेक्षा सार्वजनिक खर्च जास्त महत्त्वाचा आहे. जास्त खर्च झाल्यामुळे वस्तूंची मागणी वाढते. यामुळे देशातील व्यवसायाला प्रोत्साहन मिळते, जे अर्थव्यवस्थेसाठी खूप चांगले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावलेली दिसते तेव्हा वाढणारा व्यवसाय जास्त महत्त्वाचा बनतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 2022 2023 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.