मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ आहे. तो आटोक्यात आण्यासाठी सरकार, प्रशासन,डॉक्टर्स तसेच फ्रंटलाइनवर काम करणारे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली आहे. सीएमओ डॉक्टर मनीषा जाधव यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्या ५२ वर्षांच्या होत्या. त्यांनी मरणापूर्वी फेसबुकवर पोस्ट करत आपल्या मृत्यूचे संकेत दिले होते. त्या मुंबईतील शिवडी टीबी रुग्णालयामध्ये कार्यरत होत्या.
मुंबईतील क्षयरोग रुग्णालयाच्या सीएमओ डॉ. मनिषा जाधव यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. डॉ. मनिषा जाधव यांना मागील काही दिवसांपासून ताप येत होता त्यामुळे त्यांना कांदिवलीतील शताब्दी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
https://www.facebook.com/manisha.jadhav.5817/posts/3925014197576842
ही होती शेवटची फेसबूक पोस्ट
डॉ. मनिषा यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी फेसबुकवर गुड मॉर्निंगची एक पोस्ट टाकली होती. यामध्ये त्यांनी मी पुन्हा या व्यासपीठावर भेटू शकणार नाही, अशी खंत व्यक्त केली होती. १८ एप्रिलला त्यांनी हि पोस्ट लिहिली होती. हि पोस्ट लिहिल्यानंतर ३६ तासांनी म्हणजेच १९ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी आपल्या पोस्टद्वारे मृत्यूची कल्पना दिली होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.