हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| पावसाळा किंवा हिवाळा ऋतू आला की सर्दी खोकल्याचे रूग्ण वाढतात. बदलत्या हवामानामुळे हा सर्दी खोकला बरा होण्यास वेळ लागतो. त्यामुळे अशा काळात मस्करीत का होयना मित्र किंवा घरचे लोक आपल्याला दारू पिण्याचा सल्ला देतात. असे म्हणतात की, रम किंवा ब्रँडी पिल्याने खोकला लगेच बरा होतो. परंतु असे खरच होते का? चला जाणून घेऊयात…
खोकल्यावरील रामबाण उपाय
ज्या रुग्णांचा खोकला जात नाही त्यांना घरचे लोक दारू पिण्याचा सल्ला देतात. दारू म्हणजेच, रम आणि व्हिस्की प्या असे सांगितले जाते. कारण, रम किंवा ब्रँडी ही सर्वात जास्त उष्ण असते. हिवाळ्यात रम किंवा ब्रँडी शरीरात ही उष्णता निर्माण होते. ज्यामुळे शरीराला आतून ऊब मिळते. एखादया रुग्णाला आजारपणात याचं उबेची गरज लागते. त्यामुळे तो लवकर बरा होण्याचे चांसेस वाढतात. त्यामुळे अनेकवेळा दारूला खोकल्यावरील रामबाण उपाय म्हणणे जाते.
खरे तर, दारू शरीरासाठी घातक असली तरी ब्रँडी आणि रम मध्ये अनेक चांगले गुणधर्म असतात, असे म्हणले जाते. सर्दी -खोकला बरा करायचा असेल तर ब्रँडी आणि रम प्या. हे यासाठीच सांगितले जाते. विशेष म्हणजे, ब्रँडी आणि रम सांधे दुखी आणि अर्थराइटिसवर सारखे आजार ही बरे करते. तसेच, रम किंवा ब्रँडीमध्ये फ्लामेटरी गुण असल्यामुळे पिल्याने श्वसनाचे विकार देखील दूर होतात, असा दावा करण्यात येतो. परंतु या सर्व दाव्यात पूर्णपणे तथ्याता नाही. कारण की, किती केले तरी दारू शरीरासाठी घातक असते.
डॉक्टरांचा योग्य सल्ला
घरचे किंवा मित्र आपल्याला किती अनेक सल्ले देत असले तरी डॉक्टर देखील हेच सांगतात की, दारू शरीरासाठी घातक आहे. रम किंवा ब्रँडी पिल्याने रोग प्रतिकारशक्ती कमी होते. परंतु दुसऱ्या बाजूला रम किंवा ब्रँडी पिल्याने खोकला बरा होतो हा देखील दावा करण्यात येतो. परंतु कधी ही अशा दाव्यांवर विश्वास ठेवून कृती करण्यापूर्वी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.