हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुगल हे जगातील जवळपास सर्व माहितीचे मोठे भांडार आहे. यामार्फत आपण जगातील सर्व गोष्टीची माहिती मिळवू शकता. परंतु गुगलवर अशी काही माहिती काही लोक सर्च करत असतात ज्यामधून आपण ऑनलाइन फ्रॉडचे शिकार होऊ शकतो. आम्ही आपणास अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामधून आपल्याला नुकसान होऊ शकते.
इंटरनेटचा जास्त वापरासहित ऑनलाइन फ्रॉडचे प्रकरणही सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यूजर्स हे गुगल मार्फतच लोकांना सर्वात जास्त शिकार बनवतात. बऱ्याचदा आपण गुगलवर अशी माहिती सर्च करतो ज्यामधून भविष्यात धोका निर्माण होतो. हॅकर्स अशा वेबसाईटवर आपली वाट पाहत थांबलेलेच असतात. आपण सर्च करताच हॅकर्सचे शिकार बनतो. करोणा काळामध्ये ऑनलाइन ट्रान्झॅक्शन पहिल्यापेक्षा जास्त वाढले आहेत. यामुळे फायद्या सह ऑनलाइन फ्रॉड करणारे हॅकर्स बँकेसारखे युआरएल बनवतात. बँके सारखीच वेबसाईट बनवून वापरकर्त्यांची माहिती मिळवतात.
यासोबतच नकली वेबसाईट तयार करून कस्टमर केअरचा नंबर म्हणून हॅकर्सचे नंबर टाकले जातात. लोकांनी दिलेल्या नंबरवर कॉल केल्यानंतर त्यांची माहिती घेतली जाते. काही लोक गुगलला डॉक्टर मानून त्यावर असलेल्या माहितीनुसार आपले इलाज करतात. त्यामुळे हे बऱ्याचदा नुकसानकारक ठरते. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देताना सर्व योजनांची माहिती इंटरनेटवर टाकली जाते. या योजनेची आपली स्वतःची वेबसाईट असते. या वेबसाईटवर जाऊन आपल्याला हवी ती माहिती मिळवता येऊ शकते. या मार्गाने आपण फ्रॉडपासून स्वतःला वाचवू शकता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.